Ahemdabad Air India Plane Crash Saam TV
Video

Ahemdabad Air India Plane Crash : इंधनपुरवठा केवळ 3 सेकंदात ठप्प; एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर| VIDEO

Air India : एअर इंडियाचं विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करताच तांत्रिक बिघाडामुळे काही क्षणांतच कोसळले होते. प्राथमिक अहवालातून अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एअर इंडियाचं विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करताच तांत्रिक बिघाडामुळे काही क्षणांतच कोसळले होते. या भीषण अपघातात २७५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबत प्राथमिक चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, विमान उड्डाण केल्यानंतर अवघ्या ३ सेकंदात इंधनपुरवठा बंद झाला, त्यामुळे दोन्ही इंजिन अचानक बंद पडले आणि विमान कोसळले.

अपघातग्रस्त विमान फक्त ३२ सेकंद हवेत राहिल्याचंही प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या ३२ सेकंदात पायलट आणि सहपायलट यांच्यात झालेल्या संभाषणातही इंधनपुरवठा ठप्प झाल्याचा स्पष्ट उल्लेख आहे, असं चौकशी समितीनं स्पष्ट केलं आहे. विमानाच्या इंधन यंत्रणेत दोष होता का? तपास अद्याप सुरू असून, यंत्रणांच्या निष्काळजीपणामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली का, याकडे लक्ष वेधलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT