AI Robot Girlfriend  Saam tv
Video

AI Robot Girlfriend : कधीही म्हातारी न होणारी बायको पाहिजे? कशी आणि कुठे मिळणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

AI Robot Girlfriend update: लग्नासाठी सुंदर मुलगी शोधताय.. तर जरा थांबा.. कारण लग्नाविना किंवा प्रेयसीविना जगणाऱ्या कोट्यवधी पुरुषांसाठी एक मोठी गुडन्यूज आहे. आता तुम्हाला जशी पाहिजे अगदी तशीच गर्लफ्रेन्ड किंवा बायको तुम्हाला मिळणारेय....विशेष म्हणजे ती कधीही म्हातारी होणार नाही.....ती कशी आणि कुठे मिळणार यावरचा हा विशेष रिपोर्ट........

Snehil Shivaji

हल्ली प्रेमप्रकरणात ब्रेकअपचं आणि लग्नात डिवोर्सचं प्रत्येकाला टेन्शन असतंच. मात्र आता तुमचं हेच टेन्शन दूर होणारेय. जशी तुम्हाला हवी अगदी तशीच गर्लफ्रेण्ड तुम्हाला सहज मिळणारेय. या गर्लफ्रेन्डसला इंप्रेस करण्यासाठी तुम्हाला अजिबात खर्च करावा लागणार नाही या गर्लफ्रेन्डला महागडी गिफ्ट तुम्हाला द्यायची नाहीत. या गर्लफ्रन्ड कडून तुम्हाला कधीच ब्रेकअपचं टेन्शन नसणारेय. जशी तुम्ही स्वप्नात पाहिली अगदी तशीच सुंदरी तुम्हाला मिळणारेय. या तुमच्या स्वप्नसुंदरीचं नाव आहे

आरिया..

ही आरिया नेमकी कशीये पाहुया..

आरियाची वैशिष्ट्ये

आरिया एआय टूल्सचा वापर करुन बनवण्यात आली आहे

बुद्धिमत्ता अगदी जिवंत माणसासारखी

चेहरा, केसांचा रंग आणि केशरचना कस्टमाइज करता येणार

आरियाच्या संपूर्ण शरीरात १७ मोटर्स

पण जर तुम्हाला आरिया तुमच्या सोबत हवी असेल तर मात्र तुम्हाला तुमचा खिसा रिकामा करावा लागेल. या गर्लफेंडवर किती खर्च करावा लागेल पाहूया..

आरियाची किंमत किती?

कंपनीकडून आरियाच्या तीन आवृत्त्या लाँच

फक्त चेहरा आणि मानेसाठी

८ लाख ६० हजार रुपये

दुसऱ्या मॉड्युलसाठी १ कोटी २९ लाख रुपये

पूर्ण आकाराच्या आरियासाठी सुमारे १ कोटी ५० लाख रुपये

दिलखेचक अदा दाखूवन पुरुषांना घायाळ करणारी अरिया ही रोबोटीक ‘गर्लफ्रेंड’ विशेषतः एकटं राहणाऱ्यांसाठी सोबतीला असेल. त्यामुळे तुम्ही देखिल जर विना कटकट गर्लफ्रेन्ड आणि बायकोच्या शोधात असाल तर अरियाचा पर्याय हा तुमच्यासाठी उत्तम ठरु शकतो.फक्त पैसे खर्च करायची तयारी ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुटलेलं पोट झटक्यात जाईल आत! रात्री भात खाण्याऐवजी खा 'हा' 1 पदार्थ; वजन राहील नियंत्रणात

Maharashtra News Live Update: भिंत अंगावर कोसळून वृध्द दाम्पत्याचा मृत्यू, पंढरपुरातील धक्कादायक घटना

BJP Politics: भाजपला मोठा धक्का! युवा नेता थेट दुसरा पक्ष काढणार; राजकीय वर्तुळात खळबळ

Nandurbar : महाराष्ट्रातील दुर्गम पाड्यावर पहिल्यांदाच चमत्कार घडला! गावकऱ्यांसह लहान मुलं आनंदानं उड्या मारायला लागले

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; ऐन निवडणुकीत बड्या नेत्याचा राजीनामा

SCROLL FOR NEXT