PM Modi Visit Saam TV
Video

Ahmedabad Plane Crash : विमान अपघातातून वाचलेल्या एकमेव प्रवाशाची PM नरेंद्र मोदींनी घेतली भेट|VIDEO

Ahmedabad Plane Crash : २४१ जणांचा मृत्यु झालेल्या विमान दुर्घटनेत रमेश विश्वकुमार हा एकटाच बचावला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन त्याची भेट घेतली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहमदाबाद विमान दुर्घटनेत २४१ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असतानाच रमेश विश्वकुमार या एकमेव प्रवाशाने आश्चर्यकारकरीत्या जीव वाचवला आहे. त्याच्यावर सध्या अहमदाबादमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात भेट देत रमेशची प्रकृती विचारली आणि त्याला धीर दिला. मोदींनी डॉक्टरांशी चर्चा करत उपचारांची माहिती घेतली आहे.

या अपघातात रमेश गंभीर जखमी झाला असला, तरी त्याचा जीव वाचल्याने ही घटना आशेचा किरण ठरली आहे. मोदींनी रमेशच्या कुटुंबीयांशीही संवाद साधून त्यांना आधार दिला आहे.अपघाताच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून, या दुर्घटनेमुळे देशभरात शोककळा पसरली आहे. केंद्र सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. रमेशच्या धैर्याचं कौतुक सर्वत्र केलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, महिलेसह ३ चिमुकले गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT