Sangamner News Saam tv
Video

Sujay Vikhe Patil : अहिल्यानगर जिल्हा बँकेवर विखे-थोरातांची सत्ता; अध्यक्षपदी सुजय विखे तर उपाध्यक्ष देशमुख

Sujay Vikhe Patil latest news : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे सुजय विखे पाटील, तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची निवड झाली आहे.

Namdeo Kumbhar

Sujay Vikhe Patil elected ahilyanagar Ahmednagar District Bank chairman : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते, माजी खासदार सुजय विखे पाटील यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजितसिंह देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीत विखे-थोरातांच्या 'सहकार विकास आघाडी'ने २१ पैकी तब्बल १८ जागांवर दणदणीत विजय मिळवत बँकेवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे.

२१ पैकी १८ जागा जिंकून सहकार विकास आघाडीने जिल्हा बँकेवर आपला झेंडा फडकवला आहे. या विजयानंतर शिर्डी आणि अहिल्यानगरमध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार फटाके फोडत, घोषणाबाजी करत आणि गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये सुजय विखे यांनी दंड थोपटल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांच्या हिताचे व दुष्काळात उपयुक्त ठरणारे निर्णय घेतले जातील, असे सुजय विखे यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदाची 18 नोव्हेंबर रोजी होणार निवड

Central Government : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारी पैशात मिळणार १.८ लाखांपर्यंत लॅपटॉप, पात्रता काय? वाचा

UP Elections : विधानसभा निवडणुकीआधी पहिली ठिणगी; भाजपला पर्याय तिसऱ्या आघाडीचा; मुख्यमंत्रि‍पदाचा चेहराही ठरला

Fridge Vastu: देव्हाऱ्याच्या बाजूला फ्रिज ठेवणं अशुभ? फ्रीजजवळ कोणत्या गोष्टी ठेऊ नयेत, वास्तुशास्त्रात सांगितलेत नियम

मुंबईत आगीच्या घटनांनी 2 वर्षांचा विक्रम मोडला; दिवाळीत फटाक्यांमुळे ३३३ ठिकाणी आग

SCROLL FOR NEXT