Laxman Hake news Saam tv
Video

Laxman Hake : अहिल्यानगरमध्ये हाकेंच्या कारवर हल्ला, मनोज जरांगे म्हणाले...

Manoj jarange patil on Laxman Hake : अहिल्यानगरमध्ये ओबीसी मेळाव्यासाठी जात असताना लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला झाला. मात्र हाके यांना दुखापत झालेली नाही. या घटनेवर मनोज जरांगे पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया देत प्रसिद्धीसाठी असे हल्ले केले जात असल्याचा आरोप केला.

Namdeo Kumbhar

Manoj Jarange reaction to Hake car attack : पुण्याहून अहिल्यानगरला जात असताना लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर काही लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये हाके यांना कोणताही दुखापत झालेली नाही. अहिल्यानगरला ओबीसी मेळाव्याला जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. या हल्ल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. प्रसिद्धीसाठी स्वतःच्या गाडीवर हल्ले करून घेतात, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हाके यांच्यावर हल्ला झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, स्टंटबाज लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, ते प्रसिद्धीसाठी गाड्यावर हल्ले करून घेतात. या जातीवाद करणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायचे नाही, सगळं प्रसिद्धी साठी सुरु आहे. दगड मारून घेतात, हल्ले करून घेतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT