Crop Insurance SaamTv
Video

Crop Insurance Scheme : १ रुपयांत पिकविमा योजना बंद होणार? भरावे लागणार १०० रुपये, पाहा Video

Crop Insurance In 1 Rupee : पिकविम्यात वाढत असलेल्या भ्रष्टाचारामुळे आता शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली १ रुपयात पिकविमा ही योजना बंद होण्याची शक्यता आहे. त्याबद्दल शिफारस करण्यात आलेली आहे.

Saam Tv

एका रुपयात मिळणारी पिकविमा योजना आता बंद होण्याची शक्यता आहे. बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे एक रुपयातील पिकविमा योजना बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही शिफारस केली आहे. एका अर्जासाठी शेतकऱ्याने किमान १०० रुपये भरावे, अशाही सूचना समितीने केल्या आहेत. ओडीसामध्ये देखील १ रुपयांत पिकविमा ही योजना राबवण्यात आली होती. मात्र तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने ही योजना बंद करण्यात आली.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना १ रुपयात पिकविमा देण्याची योजना सुरू केली आहे. ज्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला विम्याचा लाभ भेटेल. मात्र आता ही योजना बंद होण्याची शक्यता आहे. त्याबद्दलची शिफारस देखील करण्यात आली आहे. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या एका समितीने शेतकऱ्यांना १ रुपयांत पिकविमा योजना बंद करून त्या ऐवजी एका पिकविम्याच्या अर्जामागे किमान १०० रुपये भरावे अशी शिफारस समितीने केलेली आहे. त्यामुळे आता यावर महायुती सरकार काय निर्णय घेईल हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, या योजनेचा गैरफायदा घेत बीडमध्ये सर्वाधिक १ लाख ९ हजार २६४ बोगस अर्ज करण्यात आलेले आहेत. तर साताऱ्यात ५३ हजार १३७ बोगस अर्ज केलेले आहेत. जळगावमध्ये ३३ हजार ७८६ बोगस अर्ज आहेत. परभणीत २१ हजार ३१५ बोगस अर्ज, सांगलीत १७ हजार २१७ शेतकऱ्यांचे बोगस अर्ज आढळून आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT