Video

Operation Sindoor नंतर भारताला आणखी एक मोठं यश, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या कामगिरीचं दिली माहिती

Narendra Modi On Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान व पीओकेमधील दहशतवादी तळांवर झालेल्या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले आणि महत्त्वाचे संदेश दिले.

Dhanshri Shintre

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जोरदार एअर स्ट्राईक केले. ९ दहशतवादी तळांवर मिसाइल हल्ले करून त्यांना उद्ध्वस्त करण्यात आले असून १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. या कारवाईची आज सकाळी भारतीय सेनेने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

कालच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दुपारी पहिले भाषण होणार असल्याने, देशभरात त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. भारताने अंतराळ क्षेत्रात इतिहास घडवला आहे. चंद्रयान-1 मोहिमेद्वारे चंद्रावर पाण्याचा शोध लावला आणि त्यानंतर चंद्रयान-2 व चंद्रयान-3 मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, भारताचा अंतराळ प्रवास ही स्पर्धा नसून मानवतेसाठीची एकत्रित वाटचाल आहे. त्यांनी मार्स मिशन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आणि गगनयान प्रकल्पाचे महत्त्वही अधोरेखित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, इस्रोने एका मिशनमध्ये 100 सॅटेलाईट एकत्र सोडण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताची आधुनिक सॅटेलाईट टेक्नॉलॉजी आणि महिला शास्त्रज्ञांचे नेतृत्व याचा गौरव करत त्यांनी 2040 पर्यंत चंद्रावर भारतीय पाऊल पडण्याचा विश्वास व्यक्त केला. भारत लवकरच स्वतःचं स्पेस स्टेशन उभारणार आहे असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरबसल्या ५ मिनिटांत ट्रान्सफर करा जुन्या कंपनीचा PF; चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळवण्यासाठी फॉलो करा 'ही' एक ट्रिक

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8व्या वेतन आयोगाबाबत लवकरच मोठा निर्णय होणार, किती असेल फिटमेंट फॅक्टर? वाचा...

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Health checkups after 40: वयाच्या 40 नंतर शरीरात सुरू होतात हे बदल, डॉक्टरांनी सांगितल्या या 4 टेस्ट करून घ्याच!

Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे 18K- 22K आणि 24K चे दर

SCROLL FOR NEXT