Pawanraje Nimbalkar Padamsinh Patil Latest News 
Video

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल २० वर्षांनंतर लागणार, माजी गृहमंत्र्यांसह ९ आरोपींना हजर राहण्याचे आदेश

२००६ मध्ये घडलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह नऊ आरोपींना न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिलेत.

Namdeo Kumbhar

२००६ मध्ये राज्यभर गाजलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज मुंबईतील न्यायालयात जाहीर होण्याची शक्यता आहे. तब्बल वीस वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यातील अंतिम निर्णयाकडे धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, माफीचा साक्षीदार पारसमल जैन, गुरूर दिग्विजय तिवारी, पिंटू ऊर्फ छोटे पांडे यांच्यासह एकूण नऊ आरोपींना कोर्टाने निकालाच्या वेळी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ३ जून २००६ रोजी मुंबईतील कळंबोलीजवळ पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास 'सीबीआय'कडे (CBI) सोपवण्यात आला होता.

सुनावणी दरम्यान तब्बल १२८ साक्षीदार तपासण्यात आले असून, तपासात अनेक राजकीय आणि गुन्हेगारी धागेदोरे समोर आले होते. या खटल्यातील काही आरोपींना यापूर्वी जामीन मिळाला असला, तरी आजच्या निकालामुळे पुन्हा एकदा संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे. न्यायालय आज नेमके कोणाला दोषी ठरवते आणि कोणाची निर्दोष मुक्तता करते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: १४ वर्षीय मुलीचं बलात्कार, वर्गमैत्रिणीच्या वडिलांचं भयंकर कृत्य

Aadhaar Address Update : आता घरबसल्या बदला आधारवरील पत्ता; नवीन Aadhaar App मुळे प्रक्रिया झाली सोपी

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Viral Video: ‘मी ड्रायव्हर आहे, नोकर नाही’, सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला ड्रायव्हरने टॅक्सीतून उतरवलं, व्हिडीओ झाला व्हायरल

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT