Nagpur News SaamTv
Video

Nagpur News : गोंड गोवारी समाजाचं आंदोलन; पोलिस आणि आंदोलकांत धरपकड

Saam Tv

नागपूरातील आदिवासी गोंड गोवारी जमातीच्यावतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे. आज या उपोषणाच्या सातव्या दिवशी जेल भरो आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये धरपकड झाली.

गोंड गोवारी जमातीला एसटीचे लाभ मिळावे, या मागणीसाठी किशोर चौधरी, सचिन चचाने आणि चंदन कोहरे आमरण उपोषणावर बसले आहेत. २९ सप्टेंबरपासून नागपूरातील संविधान चौकात हे आमरण उपोषण सुरु आहे. जानेवारी महिन्यातंही कार्यकर्त्यांनी उपोषण केलं होतं. मोठं चक्का जाम आंदोलन केल होत. त्यानंतर सरकारने निवृत्त न्यायमुर्ती वडणे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली होती. सरकारच्या आश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आलं होतं. आता वडणे समितीचा अहवाल सादर करावा यासह इतर मागण्यांना धरून आज जेल भरो आंदोलन करण्यात आलं. यशवंत स्टेडियम येथून निघालेल्या या मोर्चाला टेकडी रोडवर पोलिसांकडून अडवण्यात आल्यानंतर पोलिस आणि आंदोलकांत बाचाबाची झालेली दिसली. दरम्यान, मागील वेळीच्या आंदोलनाचा अनुभव बघता यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी लावण्यात आलेला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: लोकसभेत फटका, विधानसभेत सावध पवित्रा! भाजपने विधानसभेसाठी काय केली आहे मायक्रो प्लॅनिंग? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates : भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटलांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

Curry Leaves: रिकाम्या पोटी कढीपत्त्याची पानं खाण्याचे आरोग्यदायी फायदे...

Health Tips: पोट साफ होण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा...

Popular Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, दोन वेळा जिंकला होता ऑस्कर अवॉर्ड

SCROLL FOR NEXT