Aditya Thackeray SaamTv
Video

Aditya Thackeray : रूसवे-फुगवे किती दिवस चालू देणार? पालकमंत्रिपदावरून आदित्य ठाकरेंनी साधला महायुतीवर निशाणा | VIDEO

Aditya Thackeray Press Conference : उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेतून महायुतीवर निशाणा साधला आहे. पालकमंत्रिपदावरून महायुतीत सुरू असलेल्या वादावर त्यांनी यावेळी भाष्य केलं आहे.

Saam Tv

एकीकडे गृहखात्याला मोकळे हात दिले जात आहेत, तर दुसरीकडे गृह खातं आणि सरकारची इच्छाच नसेल तर वाल्मिक कराड सारख्या लोकांना पोलीस पकडून शकले नाही. त्यांना शरण यावं लागलं. कारण गृहखात्याच्या मनात इच्छा आहे की नाही? हा प्रश्न आहे, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर केली आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सैफ अली खान प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल धन्यावाद मानतो. बांगलादेशमधून ती व्यक्ती आपल्या देशात घुसलीच कशी? असा सवालही त्यांनी यावेळी बोलताना केला आहे.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, पोलिसांनी काल चातुर्य दाखवून सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडलं. त्याला पकडल्यानंतर अनेक गोष्टी समोर येत आहेत. पोलिसांना मोकळं मैदान दिलं आणि गृह खात्याने पोलिसांचे हात बांधले नाहीत तर पोलीस कुठेही जावून कुणीही गुन्हेगार असेल त्याला पकडून कोर्टासमोर हजर करु शकतात. पोलिसांना मोकळे हात दिले तर ते काहीही करु शकतात, असं म्हणत पाकमंत्रिपदावरून महायुतीत सुरू असलेल्या वादावरून देखील त्यांनी टोला लगावला आहे. जे मुख्यमंत्री कुणापुढे झुकत नव्हते, ते झुकतात कसे? एवढी दादगिरी सहन करतात कसे? हा प्रश्न आहे. त्यांच्याकडे संख्याबळ आहे, त्यांना दादागिरी सहन करायची गरज नाही. पण त्यांनी दादागिरी सहन करण्याचं पहिलं पाऊल टाकलं आहे. ही रूसवे-फुगवे, नाराजी कितपत चालू देणार? असं सरकार चालत असेल तर जनतेची कितपत सेवा होणार याचा आता जनतेनेच विचार करावा अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Thackeray Brothers Reunion : १९ वर्षांनंतर राज-उद्धव एकाच मंचावर, राज्यभरातून कार्यकर्ते दाखल, ठाकरेंच्या टीकेचा बाण कुणावर?

SCROLL FOR NEXT