Aditya Thackarey SaamTv
Video

Aditya Thackeray : महाराष्ट्र आमचा; हल्ला करणाऱ्यांवर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया | VIDEO

Kalyan News Update : कल्याण येथे काल झालेल्या मराठी कुटुंबाला मारहाणीच्या निषेधार्थ आज आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.

Saam Tv

कल्याणची घटना दुर्दैवी आहे. गेल्या महिन्यात देखील मारवाडी बोलण्यावरून असाच वाद मुंबईत झाला होता. मुंबई, महाराष्ट्र आमचा आहे. मुंबई आधी महाराष्ट्राची मग देशाची आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी आज कल्याणमध्ये काल एका सोसायटीत मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्याबद्दल संताप व्यक्त करत घटनेचा निषेध केला. शुक्रवारी ते माध्यमांशी बोलत होते. हे सरकार या वादाला हवा देते आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज मराठी माणसावर हल्ला करणाऱ्यांवर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची घोषणा केली पाहिजे, अशी मागणी करत यापूर्वी मराठी-अमराठी हे वाद कधी नव्हते. आता हा प्रकार कुठून आला? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मुंबईत सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. राज्यात कोणी व्हेज - नॉन व्हेज सोसायटी करत असेल तर त्याची ओसी रद्द केली पाहिजे. अशा हौसिंग सोसायटीवर कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी ठाकरेंनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer : जबड्याजवळ वेदना न होणारी गाठ? दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांनी सांगितली पॅरोटिड ट्यूमरची 7 लक्षणं

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये भाईगिरीचा प्रताप! हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटीची तोडफोड

Lavangache Pani: रात्री झोपण्यापूर्वी प्या लवंगाचे पाणी, फक्त १५ दिवसांत दिसेल रिझल्ट

गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या नाराजीनं वाढलं टेन्शन

Co-Ord Sets For Women: महिलांसाठी को-ऑर्ड सेटचे 5 लेटेस्ट पॅटर्न्स, जे अत्यंत स्टायलिश आणि कम्फर्टेबल

SCROLL FOR NEXT