Dadar Hanuman Temple SaamTv
Video

Dadar News : दादरच्या हनुमान मंदिरात महाआरती; काय म्हणाले संजय राऊत, पाहा Video

Sanjay Raut PC News : दादरच्या हनुमान मंदिराला दिलेल्या नोटिस प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेने एल्गार पुकारला असून आज या ठिकाणी महाआरती करण्यात येणार आहे.

Saam Tv

दादरमधल्या हनुमान मंदिराला रेल्वे प्रशासनाने दिलेल्या नोटिस प्रकरणी ठाकरेंनी एल्गार पुकारला आहे. दादरच्या या हनुमान मंदिरात आज संध्याकाळी महाआरती केली जाणार आहे. या महाआरतीमध्ये आदित्य ठाकरे, संजय राऊत तसंच ठाकरेसेनेचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. याबद्दल बोलताना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेनेच भाजपला हिंदुत्व शिकवलं असल्याचा दावा केला आहे. तर भाजपमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावं, असं आव्हान देखील राऊत यांनी केलं आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, दादरला 80 वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवर हमालांनी मंदिर बांधलं. तेव्हापासून कोणतीही अडचणी आलेली नाही. हा मजुरांचा देव आहे. आज संध्याकाळी साडेचार ते पाच वाजता तिथे महाआरती होणार आहे. आदित्य ठाकरे आणि मी, स्थानिक आमदार महेश सावंत तसंच हजारो शिवसैनिक त्या ठिकाणी महाआरती करणार आहे. तर भारतीय जनता पक्षाची इच्छा असेल तर हिंदू म्हणून त्यांनी देखील या आरतीला यावं. त्यांच्या हातात आम्ही गदा आणि घंटा देऊ. मात्र त्यांना हिंदुत्व कळत नसल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT