Mumbai Pune Highway Accident Saam Tv News
Video

Mumbai Pune Highway Accident: पंढरपूरला निघालेल्या भाविकांचा भीषण अपघात

आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसचा हा भीषण अपघात झालाय.

Rachana Bhondave

Mumbai-Pune Highway Accident: पुणे महामार्गावर पनवेल तालुका हद्दीत खाजगी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात होऊन बस 20 फूट खाली कोसळल्याची दुर्घटना घडलीये. पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसचा हा भीषण अपघात झालाय. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय. या बसमधून 54 जण प्रवास करत होते यातील एकूण 42 जण जखमी झालेत. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये बसमधील तिघे आणि ट्रॅक्टरवरील दोघांचा समावेश आहे. बसमधील सर्व प्रवासी हे डोंबिवली मधील रहिवासी होते. खाजगी बस पुढे अचानक ट्रॅक्टर आल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. नवी मुंबई पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी क्रेनच्या मदतीने बसला बाहेर काढले असून मदत कार्य पूर्ण झाल्यावर पुण्याकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT