Abhijeet Dipke Press conference in Sambhaji nagar saam tv
Video

Abhijeet Dipke Video : पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक मुलींचे कपडे फाडून मारहाण केली; अभिजीत दिपके काय काय म्हणाले?

abhijeet dipke alleges police assault on women protesters : दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेल्या मुलींचे कपडे फाडून त्यांना मारहाण करण्यात आली, असा गंभीर आरोप सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला.

Nandkumar Joshi

जंतरमंतरवरील आंदोलक मुलांवर लाठीमाराचा आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेला असतानाच, आता सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही अमित शहांवर गंभीर आरोप केला आहे. आंदोलक मुलांवर लाठीमार करण्याचे आदेश अमित शहांनीच दिले, असे ते म्हणाले. तर आंदोलनातील मुलांना भाजपच्या गुंडांनी मारहाण केली, त्यांना अटक का केली जात नाही, असा सवालही दिपकेंनी केला.

अभिजीत दिपके काय म्हणाले?

  • मुलांच्या डोक्यात काठ्या मारताना लाजा नाही वाटल्या? त्या काठ्यांना खिळे लावले होते. पेलेट गनचा वापर केला.

  • १२ वर्षांच्या मुलींचे कपडे फाडले. त्यांच्या डोक्यात काठ्या मारल्या. पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी मुलींचे कपडे फाडून त्यांना मारहाण केली. जसे तुमचे मुले-मुली आहेत, तसे तेही कुणाच्या तरी मुली आहेत ना? त्यांच्यावर तुम्ही दयामाया का नाही दाखवली?

  • लाठीमारचा आदेश वरून अमित शहांनी दिला. आंदोलनात मुलांना मारहाण करणाऱ्या भाजपच्या गुंडांना तुम्ही अटक का नाही करत? भाजपच्या गुंडानं मुलीला मारहाण केली, अजूनही तो मोकाट फिरतो. जयपूरमध्ये माझ्यावर हल्ला केला, त्याला पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सोडलं? तो संघाचा माणूस असल्याने सोडण्यात आलं.

  • विद्यार्थ्यांनी काही केलं नाही. विद्यार्थ्यांना त्रास दिला जात आहे. असाच त्यांना त्रास देणे सुरू ठेवलं तर आम्ही पुन्हा आंदोलन करू, रस्त्यावर उतरू.

  • मोदींच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देणाऱ्या अभिजीत दिपकेंना याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर नरेंद्र मोदी यांचा चेहरा देशाच्या भवितव्यापेक्षा तेजस्वी आहे, त्यात चुकीचे काय आहे? देशाचे भविष्य अंधारातच दिसते. मुलांवर लाठ्या चालवल्या जातात, लांबा नावाचा पोलीस अधिकारी आहे, त्याने एका मुलीच्या कानशि‍लात मारली. हिंमत कशी झाली?

  • लांबासारखे अधिकारी आहेत, त्यांनी मारहाण केली आहे. कॅमेऱ्यात ते दिसून आले आहे. मुलींना मारहाण केलीय, त्या अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही.

  • जंतरमंतर सुरक्षित करण्यापेक्षा पेपरफुटी थांबवा. नवीन विधेयक आणले आहे, त्यात पेपरफुटी झाल्यानंतर काय काय करणार आहे, ते आहे. पेपरफुटी होणार आहे, हे गृहीत धरले जात आहे. पण पेपरफुटी थांबवण्यासाठी काय उपाय कराल, ते जनतेला सांगा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळे शहराला मुसळधार पावसाने झोडपले, महापौरांनी केली पाहणी

Accident : लष्करात शोककळा! भरधाव कार विजेच्या खांबाला धडकली, मेजरचा जागीच मृत्यू, २ बडे अधिकारी गंभीर

Kidney Damage : सावधान! हाय BP मुळे निकामी होतेय किडनी; ही धोक्याची चिन्हे दुर्लक्षित करू नका

Heart Health: हार्ट अटॅकचा धोका टाळायचाय का? दररोज खा फक्त हे 1 फळ

Yavatmal Flood : पुराच्या पाण्यात वाहून गेली कार, आईसह २ मुलींचा मृत्यू; यवतमाळमध्ये पावसाचा हाहाकार

SCROLL FOR NEXT