Special Report Saam Tv News
Video

Special Report : आधुनिक हिरकणी! माऊलीने आपल्या साडीने बुडणाऱ्या 2 तरुणांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, Video Viral

Special Report : 3 तरुण गोदावरी नदी पात्रात बुडत असताना परिसरात शेळ्या चारणाऱ्या ताराबाईने प्रसंगावधान दाखवत अंगावरील साडी काढून नदी पात्रात फेकली आणि दोघांचे प्राण वाचवले..

Prasad Jagtap

दारणा धरण क्षेत्रात झालेल्या संततधारेने धरण ऐंशी टक्क्यांहून अधिक भरले आहे.. त्यामुळे हळूहळू विसर्ग वाढविण्यात आला आणि गोदावरी नदी दुथडी भरून वाहती झाली.. परिणामी नदीच्या काठावर असलेल्या विद्युत मोटारी सुरक्षित काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली. कोपरगाव तालुक्यातील तरुण शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे, प्रदीप भीमाशंकर तांगतोडे आणि अमोल भीमाशंकर तांगतोडे हे तिघे भावंडे नदीतील मोटारी काढण्यासाठी मंजूर येथील गोदावरी नदीच्या पात्रात उतरले.. दुर्दैवाने पाणी वाढल्याने तीनही तरुण वाहत गेले.. जवळच शेळ्या चारत असलेले मंजूर येथील रहिवासी ताराबाई छबूराव पवार आणि पती छबूराव बाबूराव पवार यांनी ही घटना पाहिली.. तीन तरुण वाहत जाताना दिसल्याने ताराबाई यांनी कोणताही विचार न करता तरुणांना वाचवण्यासाठी आपल्या अंगावरील साडीची दोरी बनवून पाण्यात फेकली आणि त्याआधारे तरुणांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.. ही साडी जीवनाची दोरी बनून उपलब्ध झाल्याने प्रदीप तांगतोडे आणि अमोल तांगतोडे या दोघांचे प्राण वाचले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT