Virar News  Saam Tv News
Video

Virar News | विरारच्या अर्नाळा समुद्रात उलटली बोट!

विरारच्या अर्नाळा समुद्रात मोठी बोट दुर्घटना घडली आहे. अर्नाळा किल्ल्यातील घराच्या दुरुस्तीसाठी खडी व विटा वाहून नेणारी बोट कलंडली आहे. या बोटीत एकूण १२ जण होते.

Saam TV News

Virar News | विरारच्या अर्नाळा समुद्रात मोठी बोट दुर्घटना घडली आहे. अर्नाळा किल्ल्यातील घराच्या दुरुस्तीसाठी खडी व विटा वाहून नेणारी बोट कलंडली आहे. या बोटीत एकूण १२ जण होते. त्यातील ११ जण सुरक्षित असून एकाचा मृत्यु झाला आहे. संतोष मुकने असं या दुर्घटनेत मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. पावसाळ्यापूर्वी किल्ल्यातील घरांच्या दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याने या बोटीतून विटा व रेती नेली जात होती, मात्र या बोटीच्या पंख्यात नांगरलेल्या बोटीचा दोर अडकल्याने वेगात असताना ही बोट समुद्रातच कलंडली. पाठीमागून येणाऱ्या एका बोटीमुळे 11 जण सुखरूप होऊन किनाऱ्यावर पोहोचले, मात्र एकाचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला त्याचा मृतदेह उशिरापर्यंत सापडला नाही. अर्नाळा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांकडून कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर व खाजगी बोटी मार्फत बेपत्ता इसमाचा शोध घेतला जात होता. अखेर २४ तासांनी त्याचा मृतदेह शोधण्यात यश आल्याची माहिती यांना पोलिसांनी दिली..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT