VANDE BHARAT TRAIN SaamTv
Video

VandeBharat Express : तुफान राडा ! हाणामारी करत लोको पायलट भिडले, व्हिडिओ व्हायरल

Dispute Between Loco Pilot : उदयपूर ते आग्रा दरम्यान सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत ट्रेन चालवण्यासाठी लोको पायलटमध्ये तूफान राडा झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या हाणामारीत मालमत्तेचं नुकसान झालं असून एक कर्मचारी जखमी झाला आहे.

Saam Tv

उदयपूर ते आग्रा दरम्यान सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत ट्रेन चालवण्यावरून लोको पायलट आपापसात भिडले असल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. २ सप्टेंबर रोजी सुरू झालेली ही ट्रेन आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या राड्याची सुरुवात आधी वादावादीने झाली आणि पुढे काही वेळातच हाणामारी सुरू झाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. कर्मचाऱ्यांमधील या हाणामारीत मालमत्तेचे नुकसान झाले असून एक कर्मचारी जखमी झाला आहे.

हा वाद कोटा आणि आग्रा रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये झाला होता. वंदे भारत ट्रेन चालवण्यावरून लोको पायलट आपापसात भिडले. सुरुवात आधी वादावादीने झाली आणि पुढे काही वेळातच हाणामारी झाली. ट्रेनचे लोके पायलट भिडले आणि गार्डवर हल्ला करण्यात आला. याशिवाय संतप्त कर्मचाऱ्यांनी गार्ड रूमच्या दरवाजाचे कुलूप तोडून केबिनची काच फोडली. हा वाद वाढल्यानंतर आता ही बाब रेल्वे बोर्डाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. पश्चिम मध्य रेल्वे, उत्तर पश्चिम रेल्वे आणि उत्तर रेल्वे या रेल्वेच्या कामकाजात गुंतलेल्या विविध रेल्वे विभागांमधील संघर्षामुळे सेवेच्या सुरळीत कामकाजावर परिणाम होत असल्याचे दिसते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT