VIDEO : पुण्याच्या शंकर महाराज मठात मज्जाव करत मारहाण, भाजप नगरसेवकावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल SAAM TV
Video

VIDEO : पुण्याच्या शंकर महाराज मठात मज्जाव करत मारहाण, भाजप नगरसेवकावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

Pune Shankar Maharaj Math Rada News : पुण्यातील भाजप नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यासह 4 जणांवर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या शंकर महाराज मठात मज्जाव करत मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यातील भाजप नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यासह 4 जणांवर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या शंकर महाराज मठात चेतन आरडे यांना मज्जाव करत मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.

चेतन आरडे हे मातंग समाजातील असून तळजाई वसाहत येथे वास्तव्यास आहे. 20 जून 2024 रोजी, सातारा रोड येथील शंकर महाराज मठामध्ये आरडे हे दर्शनासाठी गेले असता, त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ ही आले होते, मोहोळ यांच्यासाठी रुद्राभिषेक चालू होता. रुद्राभिषेक सुरू असताना आरडे यांना ही आत जायचे होते. परंतु नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांचे बंधू महेश शिळीमकर, अथर्व राजेंद्र शिळीमकर, अर्चित महेश शिळीमकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जातीय द्वेषातून चेतन आरडे यांना मारहाण केली.

याप्रकरणी चेतनने 112 नंबर वर डायल करून पोलिसात तक्रार केली असता पोलीस घटनास्थळी पोहचले नाही.

यावेळी चेतन हे सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी गेला असता पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कुठलाही प्रकारे जबाब व तक्रार घेतली नाही.त्यामुळे पीडित हे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणास बसले आहे.

यावेळी मारहाण व शिवीगाळ करण्याऱ्या संबंधित व्यक्तीपासून जीवितास धोका असून त्यांच्यावरती अनुसूचित जाती कायदा 1989 सुधारित 2016 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व मला न्याय द्यावा असे चेतन आरडे यांनी लेखी पत्र दिल होत.

दरम्यान याप्रकरणी राजेंद्र शिळीमकर, मुलगा अथर्व शिळीमकर, पुतण्या अर्चित शिळीमकर, महेश शिळीमकर या चौघांवर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिनाभर रोज न चुकता करा योगा, शरीरात होतील आश्चर्यकारक 5 बदल

Gold Prices Today: आनंदाची बातमी! महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

Abhijeet Dipke : जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या यशाचं क्रेडिट कोणाचं? अभिजित दीपकेंनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शौर्यभूमीत भारताच्या चाणक्यांचा स्वागत बॅनर काढला

Abhijit Dipke: शिवीगाळ नक्कीच अयोग्य, पण तो गुन्हा कसा? अभिजित दीपके यांचा थेट सवाल, थेट मोदींचं दिलं उदाहरण

SCROLL FOR NEXT