तुळजाभवानी मंदिरात सिंहासन दानपेटी घोटाळा झाला होता. या घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने आदेश करूनही भ्रष्टाचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले नाहीत. यासंदर्भात हिंदू जनजागरन समितीने अवमान याचिका दाखल केली होती. साडेआठ कोटी रुपये व सोन्या चांदीच्या दागिन्यांचा गैरव्यवहार प्रकरणी ही याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान अवमान याचिका प्रलंबित असल्याचं कारण देऊन गुन्हे दाखल करण्यास विलंब लावू नका, असे आदेश आता मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.