Dahi handi Utsav in Mumbai saam tv
Video

Dahi Handi : दहीहंडी उत्सवात थर लावताना ४१ गोविंदा जखमी, VIDEO

Dahi Handi २०२४ : मुंबईत दहीहंडी उत्सवाचा जल्लोष शिगेला पोहोचला असताना, काही ठिकाणी दहीहंडीचा थर लावताना खाली पडून ४१ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समजते.

Saam Tv

मुंबईत दहीहंडीचा उत्सव जल्लोषात सुरू आहे. मात्र, हा जल्लोष सुरू असतानाच, काही ठिकाणी मानवी मनोरे रचताना पडून ४१ गोविंदा जखमी झाले आहेत. मुंबई महापालिका प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रचताना थरावरून खाली पडल्याने गोविंदा जखमी झाले आहेत. ८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर २६ जणांवर उपचार सुरू आहेत. वृत्त हाती आले तेव्हा ७ जणांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते.

सेंट जॉर्ज हॉस्पिटल - २ रुग्ण - १ अॅडमिट, १ ओपीडीमध्ये उपचार सुरू

जीटी हॉस्पिटल - १ रुग्ण उपचारासाठी दाखल

पोद्दार रुग्णालय - ६ जणांवर उपचार करून सोडण्यात आले.

केईएम हॉस्पिटल - ८ - एकाला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ७ जणांवर ओपीडीमध्ये उपचार

नायर रुग्णालय - ओपीडीमध्ये ५ जणांवर उपचार

सायन हॉस्पिटल - तिघांवर ओपीडीमध्ये उपचार सुरू

राजावाडी - ३ रुग्ण दाखल

एमटी अग्रवाल - एका गोविंदाला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कुर्ला भाभा हॉस्पिटल - एकूण २ रुग्ण असून, एकाला दाखल करून घेण्यात आले आहे. तर अन्य एका रुग्णावर ओपीडीमध्ये उपचार

शताब्दी, गोवंडी - दोघांवर ओपीडीमध्ये उपचार

वांद्रे भाभा हॉस्पिटल - तिघांवर ओपीडीमध्ये उपचार

BDBA रुग्णालय : ओपीडीमध्ये एकावर उपचार सुरू

ट्रॉमा केअर हॉस्पिटल - एकावर ओपीडीमध्ये, तर एकावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले.

व्हीएन देसाई हॉस्पिटलमध्ये दोघांवर ओपीडीमध्ये उपचार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

Maharashtra Live News Update: मुंबईच्या भांडुपमध्ये पालिका अधिकाऱ्याला मारहाण

भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या अडचणीत; पुणे पोलिसांत तक्रार, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT