aditi tatkare Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: महिलांच्या खात्यात लवकरच २१०० रुपये खटाखट जमा होणार; मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या? VIDEO

Aditi Tatkare: लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी एक सूचक विधान केले आहे. लवकरच आम्ही दिलेल वचन पूर्ण करणार आहोत असे त्या म्हणाल्या.

Omkar Sonawane

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आपल्या प्रचाराचा हातखंडा बनवण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली. यामध्ये थेट महिलांना पंधराशे रुपये आपल्या बँक खात्यात मिळायला लागले. यानंतर महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात आम्हाला निवडून द्या आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं वचन दिलं होतं. मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये सरकारला दिलेल्या वचनाचा विसर पडला. यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी आज लाडकी बहीण योजनेबाबत मोठे विधान केलं. या योजनेमध्ये आम्ही 2100 रुपये देण्याचा वचन दिलं आहे. त्यामुळे आम्ही योग्य वेळी हे वचन पूर्ण करू असे विधान अदिती तटकरे यांनी केले. त्या म्हणाल्या, लाडकी बहिण योजना आम्ही महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी योजना सुरू केली आहे. आता या पुढचे पाऊल महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणे हे आहे. आणि 2100 चा निर्णय महायुती सरकार योग्यवेळी घेईल. जसे पंधराशे रुपये देण्याचं वचन पूर्ण केलं तसंच 2100 रुपयाचे देखील आम्ही वचन पूर्ण करणार आहोत. आम्ही दिलेल्या वचनापासून फारकत घेतली नाहीये असे आदिती तटकरे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Update : भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची कोठडी, कोर्टात काय काय घडलं?

MPSC Result : मोठी बातमी! MPSC चा निकाल जाहीर, सोलापूरचा विजय राज्यात पहिला तर मुलींमध्ये आरती अव्वल

Bank Jobs: इंडियन बँकेत नोकरीची संधी; स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती; अर्ज कसा करावा?

Hair Care : महागडा हेअर स्पा कशाला? किचनमधील 'हे' २ पदार्थ लावून कोरडे केस होतील चमकदार अन् सिल्की

Maharashtra News Live Update: अंबाजोगाईत भीषण अपघात, भरधाव ट्रकच्या धडकेत बँकेच्या अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT