Farmer Saam tv
Video

शेतकऱ्यांना २ हजारांचा हप्ता मिळणार का? कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे स्पष्टीकरण

शेतकऱ्यांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात २ हजार रुपयांचा अतिरिक्त हप्ता मिळणार असल्याच्या चर्चांवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्य सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Namdeo Kumbhar

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आणखी २ हजार रुपयांची मदत मिळणार असल्याच्या चर्चांवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ही बातमी खोटी असून, राज्य सरकारकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. २ हजार रूपयांचा हप्ता डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याच्या बातम्यात कोणतेही तथ्य नसल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

कृषीमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांचे अग्रीम अनुदान राज्य शासनाच्या तिजोरीतून देण्यात आले आहे. मदतीची रक्कम वाढवण्याबाबतचा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून, केंद्राकडून मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. सध्या शासनासमोर अशा प्रकारच्या अतिरिक्त २ हजार रुपये मदतीचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahanu Picnic : हिवाळ्यात प्रत्येक वीकेंड होईल खास, फिरा डहाणूजवळील 'हे' ६ सुंदर वन डे पिकनिक स्पॉट्स

Maharashtra News Live Update: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही मागण्या दुर्लक्षित! अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा नाशिकमध्ये थाळीनाद आंदोलन

जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या संकटमोचकाची बिनविरोध निवड; शिवसेनेने ही पहिल्यांदाच फडकवला भगवा

Winter Walking : कडाक्याच्या थंडीत सकाळी चालायला जाताय? 'या' ३ चुका टाळा, आरोग्याचं होणार नाही नुकसान

Ujjwala Yojana: 1,267 रुपयांचा गॅस सिलिंडर मिळतोय फक्त 642 रुपयांत! या महिलांना मिळतोय मोठा फायदा

SCROLL FOR NEXT