10th - 12th Board Exam News SaamTv
Video

VIDEO : दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा कधी? तारीख आली समोर | Marathi News

SSC-HSC Board Exam News : राज्यातील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांसंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तारखा ठरवल्या असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

Saam Tv

राज्यातील दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा ठरवण्यात आल्या आहेत. बारावीच्या बोर्ड परीक्षा या 11 फेब्रुवारी पासून होणार असून दहावीच्या परीक्षा या 21 फेब्रुवारीपासून सुरू होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. याबाबतचं अंतिम वेळापत्रक येत्या पंधरा दिवसात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जाहीर करेल असं देखील सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या अवघ्या 3 महिन्यांवर आलेल्या आहेत.

राज्यातील दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षांचं वेळापत्रक येत्या पंधरा दिवसात जाहीर होणार असून फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात 11 फेब्रुवारीला बारावी तर 21 फेब्रुवारीला दहावीच्या बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर होईल असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे विधानसभा संपताच काही दिवसांतच दहावी - बारावीच्या बोर्ड परीक्षांचं देखील बीगुल वाजणार आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळे शहराला मुसळधार पावसाने झोडपले, महापौरांनी केली पाहणी

Accident : लष्करात शोककळा! भरधाव कार विजेच्या खांबाला धडकली, मेजरचा जागीच मृत्यू, २ बडे अधिकारी गंभीर

Kidney Damage : सावधान! हाय BP मुळे निकामी होतेय किडनी; ही धोक्याची चिन्हे दुर्लक्षित करू नका

Heart Health: हार्ट अटॅकचा धोका टाळायचाय का? दररोज खा फक्त हे 1 फळ

Yavatmal Flood : पुराच्या पाण्यात वाहून गेली कार, आईसह २ मुलींचा मृत्यू; यवतमाळमध्ये पावसाचा हाहाकार

SCROLL FOR NEXT