Vastu tips, vastu shastra, vastu dosh ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तु

Vastu tips : श्रावण महिन्यात तुळशीचे रोप लावा, होईल अखंड धनसंपत्ती !

वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप कुठे लावायला हवे ?

कोमल दामुद्रे

मुंबई : श्रावण महिना हा निर्सग सौंदर्याने नटलेला असतो. या महिन्यात ऊन व पाऊस असे दोन्ही ऋतू अनुभवायला मिळतात.

हे देखील पहा -

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त होते. हा महिना धार्मिक उत्सव व व्रतवैकल्यांचा असतो. या महिन्यापासून अनेक सण सुरू होतात. उत्तर भारतीय पंचांगानुसार १४ जुलै २०२२ पासून श्रावण महिना सुरु झाला असून हिंदू दिनदर्शिकेनुसार हा २९ जुलै २०२२ पासून सुरू होत आहे. या काळात ऊन व पावसाचे गणित असल्यामुळे आपल्याला झाडे लावण्यासाठी हा उत्तम महिना समजला जातो. वास्तूशास्त्रानुसार आपल्या अंगणात किंवा घरात तुळशीचे रोप कुठे लावाल्यास धनसंपत्ती होईल हे जाणून घेऊया.

आयुर्वेदात जितके महत्त्व तुळशीला आहे तितकेच वास्तुशास्त्रादेखील तुळशीला महत्त्व दिले गेले आहे. तुळशीला अनेक धार्मिक कार्यात वापरले जाते. तुळशीला नैवेद्यच्या ताटात, आजारांवर बहुगुणी ठरते. पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णूला अंत्यत प्रिय आहे. घरात किंवा अंगणात तुळशीचे रोप लावल्यास वास्तु दोषांचा प्रभाव राहत नाही.

वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या (Home) अंगणात तुळशी पूर्व किंवा उत्तर कोपऱ्यात लावायला हवे. ही आरोग्यदायी वनस्पती असून तुळशीला लक्ष्मीचे रुप मानले जाते. या महिन्यात तुळशी लावल्याने घरात सुख-समृध्दी होते. तसेच नियमितपणे तुळशीच्या रोपाला जल अर्पण करुन त्याच्या सभोवताली प्रदक्षिणा घातल्यास व त्याची पूजा केल्याने आर्थिक लाभ होतात. आर्थिक लाभासाठी तुळशीची पाने लाल कापड्यात बांधून तिजोरीत किंवा आपल्या पर्समध्ये ठेवल्यास धनात वाढ होते. तसेच गंगाजलात तुळशीची पाने टाकून हे पाणी (Water) घरात शिंपडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची आज नागपुरात महत्त्वपूर्ण बैठक

Pune News: होर्मुझमध्ये इराणकडून जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला, पुण्याच्या इंजिनिअरचा मृत्यू

Malvan Fort : मालवणमधील ऐतिहासिक रत्न! अरबी समुद्रावर नजर ठेवणारा 'हा' किल्ला आजही दिमाखात आहे उभा

अवघ्या २० मिनिटांत बनवा मऊसूत ओट्स इडली; घरच्या घरी करा 'ही' सोपी रेसिपी

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर

SCROLL FOR NEXT