Vastu tips  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तु

वास्तुशास्त्रानुसार घराचे बांधकाम करताना दिशा कशी विचारात घ्याल ?

घर बांधताना आपण घरातील प्रत्येक कानाकोपऱ्याची काळजी घेत असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : घर हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. घर बांधताना आपण घरातील प्रत्येक कानाकोपऱ्याची काळजी घेत असतो.

हे देखील पहा -

घर (Home) बांधताना, फ्लॅट घेताना, घरातील कार्यालयातील रचना करताना ज्या आठ दिशा आहेत त्यांचा आपण विचार करायला हव्या. प्रत्येक दिशेचे त्याच्यानुसार महत्त्व असते त्या दिशेचे चांगले व वाईट असे दोन्ही स्वरुपाचे फले मिळतात. आकाशतत्त्व घराच्या मध्यभागी असते. इतर तत्त्वांचे या जागेवर प्रभुत्व असते.

या दिशानुसार घरातील वास्तुचे बांधकाम करा-

१. उत्तर दिशेचा स्वामी हा धनाचा (Money) देव कुबेर आहे. याचा प्रतिनिधी बुध ग्रह आहे. वास्तू बांधताना उत्तर दिशेकडे जास्तीत जास्ती मोकळी जागा घ्यावी. यामुळे जीवनभर आर्थिक स्थिती चांगली राहते. हे मातृस्थान असल्यामुळे हा भाग घरातील इतर स्थानांच्या मानाने उंच आणि घाणेरडा नसावा. अन्यथा घरच्या स्त्रीला (Womens) नेहमी शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागेल.

२. उत्तर, ईशान्य, पूर्व या कोपऱ्यात पाण्याची टाकी, स्विमिंग पूल, तलाव असल्यास घरची इतर मंडळी संवेदनशील, बुद्धिमान राहतात. त्यामुळे सुखी, समृद्ध जीवन प्राप्त होते. या भागात स्वयंपाकघर, स्टोअर रूम किंवा नोकरांसाठी राहण्याची जागा धोकादायक असते. तसेच कार, वाहने, स्कूटर्स वगैरे ठेवण्याची ही जागा नसावी. मुख्य दरवाजा, व्हरांडा, बैठकीची खोली, बाल्कनी असणे येथे योग्य राहील.

३. पूर्व दिशेच्या खालोखाल या दिशेला महत्त्व आहे. उत्तर याचा अर्थ अतिउत्तम, नेहमी वाढणारा असा आहे. कुबेराच्या स्वामित्वामुळे या दिशेकडे धनसंपत्तीची रेलचेल असते. वास्तूतील पैशांचे कपाट किंवा तिजोरीचे तोंड उत्तर दिशेला करून ठेवावे अशी वास्तुशास्त्र मान्याता आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संत सोपान काकांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा आज पार पडला

इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून तुफान चर्चा; नितीन गडकरींची बदनामी केल्याप्रकरणी ४ प्रसिद्ध एन्फ्ल्यूएन्सर कोण? कोणावर गुन्हा दाखल

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ₹१५०० जमा, जूनच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला आले का? लगेच अकाऊंट तपासा

Diabetes medication: सकाळी की रात्री? डायबेटीजची औषधं कधी घेतल्याने होतो फायदा?

Shah Rukh Khan: शाहरुख खानला सुप्रीम कोर्ट कडून मोठा दिलासा; मन्नतच्या कामाला विरोध करणाऱ्यांना सुनावले खडेबोल

SCROLL FOR NEXT