Astro tips for money, vastu tips
Astro tips for money, vastu tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तु

Astro tips for money : स्वयंपाकघरातील या पदार्थांचा वापर केल्यास हातात खेळेल पैसाच पैसा

कोमल दामुद्रे

मुंबई : परिश्रम केल्याशिवाय कोणत्याच गोष्टीच फळ मिळत नाही. पैसे कमावण्यासाठी देखील आपण अथक परिश्रम करत असतो परंतु, ते आपल्याकडे जास्त काळ टिकत नाही. पैसे टिकवण्यासाठी आपण ज्योतिष्यांनी सांगितलेल्या काही उपाय केले तर नक्कीच पैसा टिकण्यास मदत होईल. (Astro tips for money)

हे देखील पहा -

१. वास्तूशास्त्रानुसार आपण घरात किंवा ऑफिसच्या मुख्य दरवाजाला लसणाच्या पाकळ्या लावल्याने नकारात्मक ऊर्जाचे नाश होण्यास मदत होईल. तसेच आपल्या घरात सुख व समृध्दी नांदेल. असे मानले जाते लसणाने आपल्या आजूबाजूची नैतिक ऊर्जा नष्ट केली जाते.

२. पैसे कमावून सुध्दा ते आपल्या जवळ टिकत नसतील तर, लसणाच्या काही पाकळ्या व लवंगला लाल कपड्यात आपल्या तिजोरीत, पॉकेटमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी हे ठेवा. हा उपाय प्रत्येक शनिवारी केल्याने पैशांची कमतरता जाणवणार नाही.

३. सध्या आपले किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीचे आरोग्य सुदृढ नसेल तर लसणाच्या काही पाकळ्या हळदीसोबत आपल्या स्वयंपाकघरात ठेवल्याने आपले आरोग्य निरोगी राहिल.

४. घरात जर सतत पैसा (Money) खेळत राहावा असा वाटत असलेत तर, आपण सुखलेल्या कच्च्या हळदीच्या (Turmeric) मूळ, तांदूळ व लसणाच्या काही पाकळ्या नव्या कोऱ्या पिवळ्या कापडात गुंडाळून तिजोरीत ठेवा. यामुळे पैसा टिकून राहण्यास मदत होईल.

५. कामात सतत अडचणी किंवा व्यवसायात नुकसान होत असेल तर दुकान किंवा ऑफिसच्या मुख्य दरवाजाला लसणाच्या ५ ते ६ पाकळ्या लाल कापडात गुंडाळून दरवाजाला बांधाव्यात. यामुळे व्यवसायात बढती होईल.

६. घरात सतत भांडण होत असतील तर मंगळवारी किंवा शनिवारी संध्याकाळी लसणाच्या २ पाकळ्या मोहरी व मिरची सोबत जाळा. असे केल्याने घरातील वातावरण चांगले होईल. यामुळे घरात होणारे वाद व तणाव कमी होतील.

७. लसणाच्या काही पाकळ्या लाल कापडात बांधून घरातील उत्तर दिशेला जमीनीच्या खाली पुरल्याने धनात वाढ होण्यास मदत होईल.

८. आपल्या घरात सतत नकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवत असेल तर घराच्या चारही कोपऱ्यात लसणाच्या पाकळ्या ठेवा. या पाकळ्या आठवड्याने सतत बदलत रहा. यामुळे घरातील नैतिक ऊर्जा नाहीशी होईल.

९. रात्री झोपल्यानंतर भीतीदायक स्वप्न पडत असतील तर आपल्या उशी खाली लसणाच्या पाकळ्या ठेवा. दुसऱ्या दिवशी या पाकळ्या फेकून द्या. असे केल्याने वाईट स्वप्न पडणार नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: घरात मनी प्लांट लावताना या चुका टाळा; अन्यथा प्रगती थांबेल

Today's Marathi News Live: ४ जूननंतर अच्छे दिनाची सुरुवात होईल - उद्धव ठाकरे

Khadakwasla Dam Water Level: पुणेकरांना दिलासा, पाणीकपातीचे संकट टळलं; जाणून घ्या खडकवासला धरण साखळी पाणीसाठ्याची स्थिती

Chardham Yatra Bus Accident | बुलढाण्यातून चारधाम यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या बसला भीषण आग

Soami Bagh Mausoleum : सेम टू सेम ताजमहालच! बांधकामाला १०० हून अधिक वर्षांचा काळ; पर्यटकांचं ठरतंय आकर्षण

SCROLL FOR NEXT