Pakistan bows down against Kulbhushan Jadhav execution 
स्पॉटलाईट

कुलभूषण जाधव यांच्या फाशीबाबत पाकिस्तान झुकला... 

अक्षय कस्पटे

वृत्तसंस्था : पाकिस्तानी Pakistan संसदेमध्ये कुलभूषण जाधव यांच्या संदर्भातील महत्वाचे विधेयक संमत केले आहे. भारताचे India माजी नौदल अधिकारी असणारे कुलभूषण यांना हेरगिरीच्या Helgiri गुन्हाअंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, कुलभूषण यांना या शिक्षेविरोधात पाकिस्तान उच्च न्यायालयामध्ये दाद मागता येणार असल्याचे  वृत्त एएनआयने ANI दिले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालावर कुलभूषण यांना आता पाकिस्तानच्या उच्च न्यायालयांमध्ये High Court शिक्षेसंदर्भात फेरविचार याचिका दाखल करता येणार आहे. Pakistan bows down against Kulbhushan Jadhav execution

पाकिस्तानमधील कनिष्ठ सभागृहाने नवीन कायदा काढला आहे. २१ सदस्यांच्या स्थायी समितीने परवानगी Permission दिल्यानंतर हा कायदा काढण्यात आला आहे. या कायद्याला आंतरराष्ट्रीय न्यायालय (पुनरावलोकन आणि पुनर्विचार) कायदा असे नाव देण्यात आले आहे. हा कायदा संपूर्ण पाकिस्तानमध्ये एकाच वेळी लागू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या अगोदर पाकिस्तानच्या संसदेमध्ये कुलभूषण प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय International न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर यासंदर्भातील आदेश जारी केला होता. आता त्याचं आदेशाचे कायद्यात रुपांतर झाले आहे.

पाकिस्तानने केलेल्या आरोपनुसार, कुलभूषण यांना २०१६ साली बलुचिस्तानमधून Balochistan अटक Arrested केली होती. हेरगिरीच्या गुन्ह्याखाली त्यांना दोषी ठरवत लष्करी न्यायालय मध्ये २०१७ साली फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताने पाकिस्तानचा हा दावा मोडून काढला आहे. कुलभूषण यांचं पाकिस्तान मध्ये अपहरण केल्याचा दावा भारताने केला होता. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी इराण मधील चाबार बंदरावरुन कुलभूषण याचे अपहरण Kidnapping केल्याचे भारत देशाचे म्हणणे आहे. कुलभूषण हे इराण मध्ये व्यापारासाठी गेले होते असे भारताने म्हटलंय आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने २०१८ साली कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणली होती. Pakistan bows down against Kulbhushan Jadhav execution

नवीन कायदा हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशा संदर्भामध्ये आहे. नवीन कायद्यानुसार उच्च न्यायालयात अधिक अधिकार देण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने परदेशी व्यक्तीच्या हक्कांन संदर्भात व्हिएन्नामधील आंतरराष्ट्रीय कराराच्या आधारावर किंवा परदेशी व्यक्तीला असणाऱ्या कायदेशीर अधिकारांन अंतर्गत सुनावण्यात येणाऱ्या शिक्षेवर पाकिस्तानी उच्च न्यायालयाला पुनर्विचार करता येणार आहे.

हे देखील पहा 

पाकिस्तानमध्ये एखादी परदेशी व्यक्ती स्वत: किंवा एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून व त्याच्या देशाच्या काऊन्सिलर ऑफिसरच्या माध्मयातून उच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करु शकतो. यावर लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेवर पुनरावलोकन आणि पुनर्विचार याचिका दाखल करण्याचे हक्क देण्यात आल आहे. यामध्ये पाकिस्तानी लष्करी न्यायालय संदर्भातील १९५२ च्या कायद्या अंतर्गत सुनावण्यात येणाऱ्या खटल्यांवरही पुनर्विचार याचिका दाखल करता येणार आहे. या निर्णयामुळे कुलभूषण यांना आता भारतीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा वकिलांच्या माध्यमातून उच्च न्यायालय मध्ये फाशीच्या शिक्षेसंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करता येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT