चिकन प्रेमींची चिंता वाढवणारी एक बातमी चिनमधून समोर आलेय. चिनमध्ये फ्रोझन चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडलाय. ज्यामुळे जगभरातले चिकनप्रेमी आता चिंतेत सापडलेत. बघुयात चीनमध्ये नेमकं काय घडलंय.
चीनने केलेल्या या नव्या आवाहनामुळे चिकनप्रेमी चक्रावलेत. त्याचं झालंय असं, की चीनच्या शेनझेन मधील एका लॅबमध्ये ब्राझीलमधून आलेल्या फ्रोझन चिकनची कोरोना टेस्ट करण्यात आली. आणि या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर स्थानिक सीडीसीने पॅकेज फूड न खाण्याचं आवाहन केलं. मात्र या घटनेमुळे जगभरात चर्चा सुरु झाली, की कोरोनाच्या या संकटात पॅकेज फूड खाणं किती सुरक्षित आहे.
जगभरात चीनमध्ये घडलेल्या या घटनेनंतर प्रतिक्रिया येतायत...
फ्रोझन चिकनमध्ये कोरोना?
कोरोना व्हायरस पसरला. तेव्हापासूनच चीन सातत्याने खोटं बोलून जगाची दिशाभूल करतोय. त्यामुळे जगासमोरच्या अडचणी अधिकाधिक वाढत गेल्यात. अशात चीनने चिकनबाबत केलेल्या या नव्या दाव्यावर विश्वास कसा ठेवायचा. हा ही प्रश्न बाकी उरतोच.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.