स्पॉटलाईट

नितीश कुमारांना दिग्विजय सिंगांचं आर्जव, BJP ची साथ सोडण्याचा दिला सल्ला

साम टीव्ही

बिहारमध्ये एनडीएच्या सत्तास्थापनेची तयारी सुरू असताना काँग्रेसने मात्र नितिश कुमारांना भावनिक साद घातलीय.

बिहारमध्ये नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार बनण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. पण काँग्रेसने मात्र अजूनही सत्तेची आशा सोडलेली दिसत नाही. अवघ्या 19 जागा जिंकूनही काँग्रेसने नितीश कुमारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केलेत. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एक ट्वीट करत नितीश कुमारांना साद घातलीय.

'भाजपा आणि संघ हे अमरवेलीसारखे आहेत. अमरवेल आंब्याच्या झाडाला लगडून सगळा रस शोषून स्वत: वाढते. झाडाला मात्र सुकवून टाकते. लालूप्रसाद आणि आपण एकत्र संघर्ष केलाय. अनेक आंदोलनात तुरुंगवासही भोगलाय. संघरूपी अमरवेलीची साथ सोडून तेजस्वी यादवांना पाठबळ द्या.'

राजद आणि काँग्रेस महाआघाडीकडे 110 जागा असून बहुमतासाठी त्यांना 12 जागांची गरज आहे. नितीश कुमारांची साथ मिळाल्यास भाजपला बाहेर ठेवत बिहारमध्येही 'महाराष्ट्र पॅटर्न' साकारला जाऊ शकतो, अशी आशा काँग्रेसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hockey World Cup 2026 : वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा; भरवशाच्या खेळाडूवर नेतृत्वाची धुरा, कुणाला संधी, कुणाला वगळलं?

Raigad Fort : रायगड किल्ल्याची 'ही' रहस्ये तुम्हाला माहीत आहेत का? वाचून व्हाल थक्क

Heart Attack : डेंग्यूमुळे वाढतो हार्ट अटॅकचा धोका? सुरुवातीच्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Rain Alert: पुढचे ३ दिवस पाऊस झोडपून काढणार, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना भाजपकडून मोठा धक्का, बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतलं 'कमळ'

SCROLL FOR NEXT