चाहत्यांच्या आग्रहास्तव युवराज सिंग पुन्हा उतरणार मैदानात; केली मोठी घोषणा Saam Tv
Sports

चाहत्यांच्या आग्रहास्तव युवराज सिंग पुन्हा उतरणार मैदानात; केली मोठी घोषणा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज स्फोटक फलंदाज युवराज सिंग याने अचानक मोठी घोषणा करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज स्फोटक फलंदाज युवराज सिंग Yuvraj Singh याने अचानक मोठी घोषणा करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांच्या या घोषणेने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. क्रिकेटच्या मैदानात त्याच्या पुनरागमनाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणारा युवराज सिंग यानं एक निर्णय घेतला आहे. आपण पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याची घोषणा त्यानं इन्स्टाग्रामवरील पोस्टद्वारे केली. "देवचं तुमचं नशिब ठरवतो" असं म्हणत त्यांनं एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. आपण पुन्हा कधी मैदानात दिसू हे देखील त्यानं यातून सांगितलं आहे.

काय आहे युवराजची पोस्ट?

य़ुवराजनं इन्स्टावर Instagram एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने केलेल्या काही खेळींचा माहिती आहे. तसेच या व्हिडिओसाठी एक डिस्क्रिप्शनही त्याने दिलं आहे. यामध्ये तो म्हणतो आहे, देवच तुमचं नशिब ठरवतो. चाहत्यांच्या प्रेमाखातर मी फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा पिचवर उतरेल. अशी आशा आहे. या भावनेसारखं दुसरं काहीही नाही. तुमच्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद. माझ्यासाठी या शुभेच्छा ही खूप मोठी बाब आहे. पाठिंबा देत रहा. ही आमची टीम आहे आणि खरा चाहता या कठीण काळात त्याचा पाठिंबा दाखवेल.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT