viral cricket video instagram
Sports

Viral Video: हा आनंद पैशाने विकत घेता येत नाही..फलंदाजाने चौकार मारताच चिमुकल्याचा मैदानात येऊन भन्नाट डान्स

Viral Dance Video On Cricket Ground: क्रिकेटच्या मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहून चिमुकला मैदानात येऊन भन्नाट डान्स करु लागला. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

क्रिकेटच्या मैदानावर चौकार षटकांराचा पाऊस पाहायला मिळत असतो. आपल्या आवडत्या खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी प्रेक्षकही मैदानात येऊस दिलखुलास सपोर्ट करत असतात. लेदर बॉल क्रिकेटसह टेनिस बॉल क्रिकेटची क्रेझही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

देशासह राज्यातही अनेक टेनिस क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. यी स्पर्धांमध्ये विजेत्या संघांना लाखोचे बक्षीस दिले जाते. अशीच काहीशी स्पर्धा ठाणे जिल्ह्यातील कोनगावमध्ये पार पडली. या स्पर्धेतील काही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

लहान मुलाचा मैदानात येऊन भन्नाट डान्स

डे- नाईट क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी तरुणांसह लहान मुलेही मैदानात येत असतात. फलंदाजाने चौकार मारल्यानंतर एका लहान मुलाने थेट मैदानात एन्ट्री केली आणि आनंद साजरा करत भन्नाट डान्स केला.

त्याचा डान्स पाहून असंच दिसतंय, ही मजा पैशांनी विकत घेता येत नाही. आपला आवडता खेळाडू मैदानात खेळतोय, त्याने संघासाठी चौकार मारला. मग जल्लोष तर करायलाच हवा ना. जल्लोष करण्यासाठी हा लहान फॅन मैदानात आला आणि डान्स करु लागला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हा व्हिडिओ rutik_khasase_10 या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून, नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडताना दिसून येत आहेत.

हा आनंद पैशाने विकत घेता येत नाही, त्यासाठी मैदानात यावं लागतं, असं एका फॅनने म्हटलं आहे. तर आणखी एका युझरने एकच नंबर अशी कमेंट केली आहे.

याच स्पर्धेतील आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक फॅन मैदानात येतो आणि चौकार- षटकार मारणाऱ्या फॅनच्या अंगावर पैशांचा पाऊस पाडतो. हे दोन्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेन्डिंगला आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crispy Corn Bhaji: पावसाळ्यात चहासोबत बनवा खमंग क्रिस्पी कॉर्न भजी; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळणे, कोंडा आणि चिकटपणा टाळायचा? मग घरीच घ्या केसांची अशी काळजी

Steel Tea Strainer: घाणेरडी काळी झालेली चहाची गाळणी मिनिटांत चमकेल! फक्त वापरा 'हा' १ सोपा घरगुती उपाय; दिसेल जादू

Crime News : धक्कादायक! व्यसन न करण्याच्या सल्ल्यावरून भडकला; संतापलेल्या १५ वर्षीय मुलानं क्रूरपणे जीव घेतला

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT