wpl auction  twitter
Sports

WPL 2025: WPL स्पर्धेचं ठिकाण ठरलं! या २ शहरात होणार सामने; केव्हा होणार सुरुवात?

WPL 2025 Venue And Date: वुमेन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेेतील सामने केव्हा आणि कुठे होणार? जाणून घ्या काय आहे लेटेस्ट अपडेट.

Ankush Dhavre

वुमेन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. काही दिवसांपूर्वी बंगळुरुत या स्पर्धेसाठीचा लिलाव पार पडला. या लिलावात युवा खेळाडूंवर कोटींची बोली लागली. या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा लवकरच केली जाऊ शकते.

दरम्यान या स्पर्धेतील सामने कुठे होणार? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या स्पर्धेतील सामने बडोदा आणि लखनऊमध्ये खेळवले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

वुमेन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला येत्या ६ किंवा ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होऊ शकते. हे सामने लखनऊ आणि बडोद्यात रंगणार आहेत. या स्पर्धेतील फायनलचा सामना देखील या दोघांपैकी एका स्टेडियमवर रंगणार आहे.

केव्हा होणार घोषणा?

या स्पर्धेत ५ संघ खेळताना दिसून येणार आहेत. मात्र पाचही संघांना सामने कुठे होणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. माध्यमातील वृत्तानुसार हे सामने, लखनऊच्या उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन किंवा बडोद्यातील बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवले जाऊ शकतात. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

लखनऊच्या मैदानावर यापूर्वीही अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. तर बडोदाचं स्टेडियम नवीनच आहे. यापूर्वी भारतीय महिला संघ आणि वेस्टइंडीज महिला संघ यांच्यात झालेला सामना याच मैदानावर खेळवला गेला होता.

फायनलचा सामना केव्हा होणार?

या स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन २ टप्प्यात केले जाऊ शकते. या स्पर्धेची सुरुवात ६ किंवा ७ फेब्रुवारीला होऊन स्पर्धेतील फायनलचा सामना ८ किंवा ९ मार्चला आयोजित केला जाऊ शकतो. गेल्या हंमामात या स्पर्धेचे आयोजन बंगळुरु आणि दिल्ली या मैदानावर केले गेले होते. त्यापूर्वी संपूर्ण हंगामाचे आयोजन मुंबईत केले गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT