WPL 2024 royal challengers bangalore beat mumbai indians to enter in playoffs allyese perry played crucial knock saam tv
Sports

WPL Playoffs: मुंबईच्या पराभवानं RCB ची चांदी! पेरीच्या विक्रमी खेळीनं मिळवून दिलं प्लेऑफचं तिकीट

Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore: वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. या स्पर्धेतील साखळी सामने समाप्त झाले असून लवकरच प्लेऑफच्या सामन्यांना प्रारंभ होणार आहे.

Ankush Dhavre

WPL 2024 Playoffs,Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore:

वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. या स्पर्धेतील साखळी सामने समाप्त झाले असून लवकरच प्लेऑफच्या सामन्यांना प्रारंभ होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सने आपलं स्थान निश्चित केलं आहे.

तर मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात गोलंदाजीत आणि फलंदाजीत दमदार कामगिरी करणारी एलिस पेरी ही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या विजयाची शिलेदार ठरली आहे.

पेरीची विक्रमी कामगिरी...

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची कर्णधार एलिस पेरीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या संघाकडून गोलंदाजी करताना एलिस पेरीने शानदार खेळ करून दाखवला. या डावात तिने ४,५ नव्हे तर तब्बल ६ गडी बाद केले. तिच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाचा डाव अवघ्या ११३ धावांवर संपुष्टात आला.

गोलंदाजीनंतर फलंदाजीत शानदार कामगिरी..

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून एलिस पेरीने पैसा वसूल फलंदाजी केली आहे. गेल्या ५ सामन्यातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, तिने ४९,२४,५८, ४४ आणि २३ धावांची खेळी केली. मुंबईविरुद्धच्या सामन्यात आव्हान छोटं होतं मात्र अवघ्या ३९ धावांवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे ३ फलंदाज माघारी परतले होते. (Cricket news in marathi)

असं असताना पेरीने ४० धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. तर ऋचा घोषनेही तिला चांगली साथ दिली. तिने ३६ धावांची खेळी केली. या दमदार कामगिरीच्या बळावर एलिस पेरीने इतिहास रचला आहे. ती गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी गोलंदाज ठरली आहे. तिने १५ धावा खर्च करत ६ गडी बाद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT