viral catch video twitter
Sports

Viral Catch Celebration: बोले तो एकदम झकास! गोलंदाजाने विकेट घेताच केलेलं सेलिब्रेशन पाहून पोट धरुन हसाल -VIDEO

WCPL, Catch Celebration Video: वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील फायनलमध्ये महिला गोलंदाजाने झेल टिपल्यानंतर हटके सेलिब्रेशन केलं आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

क्रिकेटमध्ये विकेट घेतल्यानंतर गोलंदाजाने सेलिब्रेशन करणं साहजिकच आहे. गोलंदाज या सेलिब्रेशनद्वारे फलंदाजाला बाद करण्याचा आनंद व्यक्त करत असतात. काही गोलदाजांनी केलेलं सेलिब्रेशन हे नॉर्मल असतं, तर काही गोलंदाजांनी केलेलं सेलिब्रेशन हे पोट धरुन हसवणारं असतं.

असंच काहीसं सेलिब्रेशन वुमेन्स कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतील फायनलमध्ये केल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

तर झाले असे की, प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाकडून डियांड्रा डॉटीन आणि जेनेलिया ग्लासगो ही जोडी मैदानावर आली होती. या जोडीला हवी तशी सुरुवात करुन देता आली नाही. डॉटीन अवघ्या ६ धावा करत माघारी परतली. त्यानंतर ग्लोसगोने डाव सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र तिचा डाव २४ धावांवर आटोपला.

गोलंदाजाचं हटके सेलिब्रेशन

तर झाले असे की, पहिल्या डावातील १२ वे षटक सुरु असताना आलिया अॅलिन गोलंदाजी करत होती. त्यावेळी षटकातील पहिल्याच चेंडूवर ग्लासगोने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू हवेत गेला.

त्यावेळी अमांडा वेलिंगटन धावत झेल टिपला. हा झेल मुळीच सोपा नव्हता. मात्र झेल टिपल्यानंतर गोलंदाज अॅलिनकडून हटके सेलिब्रेशन पाहायला मिळालं आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाही.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील फायनलचा सामना ट्रिनबागो नाईट रायडर्स आणि बारबाडोस रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.या सामन्यात बारबाडोसने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ट्रिनबागो नाईट रायडर्सने २० षटकअखेर ८ गडी बाद ९३ धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी बारबाडोस रॉयल्स संघाला अवघ्या ९४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बारबाडोस रॉयल्स संघाने १५ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं आणि जेतेपदावर नाव कोरलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

SCROLL FOR NEXT