Deandra Dottin Catch Saam TV
Sports

Women’s World Cup: विंडीजच्या महिला खेळाडूचा अद्भूत कॅच; पाहा Video

या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

वृत्तसंस्था

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला विश्वचषक (ICC Women’s World Cup) स्पर्धेत बुधवारी वेस्ट इंडिज आणि इंग्लंड (WI vs ENG) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात चाहत्यांना वेस्ट इंडिजची खेळाडू डिआंड्रा डॉटिनने (Deandra Dottin) घेतलेला एक जबरदस्त झेल पाहायला मिळाला. एका हाताने घेतलेला तिचा झेल इतका अप्रतिम होता की सोशल मीडियावर तिचे कौतुक होत आहे. या सामन्यात डॉटिनची बॅट शांत होती, पण या झेलने तिच्या चाहत्यांना नक्कीच प्रभावित केले.

या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संथ फलंदाजी करताना त्यांनी 50 षटकांत 6 गडी गमावून 225 धावा केल्या. यानंतर जेव्हा इंग्लंडची फलंदाजी सुरू झाली तेव्हा वेस्ट इंडिजने गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही अप्रतिम कामगिरी केली.

नवव्या षटकात शमिलिया कॉनेल गोलंदाजीसाठी आली. त्यावेळी इंग्लंडची फलंदाज विनफिल्ड हिल स्ट्राइकवर होती. ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर हिलने कट करून पॉइंटच्या दिशेने शॉट खेळला. डॉटिन तिथे क्षेत्ररक्षण करत होती. डायव्हिंग करताना एका हाताने हवेत तिने शानदार झेल घेतला. हिलला केवळ 12 धावा करता आल्या आणि डॉटिनच्या शानदार झेलमुळे ती पॅव्हेलियनमध्ये परतली. या झेलच्या रुपात वेस्ट इंडिजला पहिला बळी मिळाला.

डॉटिनने गेल्या सामन्यात आपल्या संघाला न्यूझीलंडविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवून दिला होता. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 6 धावांची गरज होती. ही ओव्हर डॉटिनने ठेवले होती. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डॉटिनने मार्टिनला बाद केले. न्यूझीलंडला शेवटच्या 3 चेंडूत 4 धावांची गरज होती, परंतु चौथ्या चेंडूवर डॉटिनने जेस केरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि त्यानंतर डॉटिन आणि कॅम्पबेल यांनी 5व्या चेंडूवर जोनासला धावबाद केले आणि न्यूझीलंडचा डाव 256 धावांवर आटोपला.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price : अचानक किंमती घसरल्या! चांदी ₹१७०००, सोनं ₹३००० ने स्वस्त; वाचा 24K, 22K, 18K गोल्डचे ताजे दर

Nashik : नाशिक हादरलं! पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

पुण्यातील रुग्णालयात बॉम्ब ठेवणारा आरोपी कोण? नागपूर कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

SCROLL FOR NEXT