WTC Final IND vs AUS
WTC Final IND vs AUS Saam Tv
क्रीडा | IPL

WTC Final IND vs AUS : टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सलग दुसऱ्यांदा इंग्लंडमध्ये का? चकीत करणारी माहिती आली समोर

प्रविण वाकचौरे

WTC Final IND vs AUS : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ जेतेपदासाठी एकमेकांशी भिडणार आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर ही लढत होणार आहे. सलग दुसऱ्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना इंग्लंडमध्ये होत आहे.

याआधी 2021 मध्ये लॉर्ड्स स्टेडियमवर अंतिम सामना खेळला गेला होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हा सामना झाला होता. या सामन्यात न्यझीलंडने बाजी मारत जेतेपदावर आपलं नाव कोरलं होतं.

इंग्लंडमधील क्रिकेट कंडिशनचा भारतापेक्षा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या संघांना जास्त फायदा होतो. त्यात आयसीसीने सलग दुसऱ्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये ठेवल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये काहीशी नाराजी दिसत आहे. त्यामुळे हा अंतिम सामना इंग्लंडमध्येच का खेळवला जात आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र अंतिम सामना इंग्लंडमध्ये होणे हा योगायोग नाही तर आयसीसीची प्लानिंग आहे. (Latest Sports News)

WTC अंतिम सामना इंग्लंडमध्येच का?

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना शेड्युल जूनमध्ये होणार हे आधीच ठरलं होतं. जून महिन्यात भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका याठिकाणचं वातावरण क्रिकेटसाठी अनुकूल नसतं. या महिन्यात वरील देशांमध्ये पावसाची दाट शक्यता किंवा कडाक्याची थंडी असते. मात्र इंग्लंडमधील वातावरण क्रिकेटसाठी अनुकूल असतं. (WTC Final 2023)

इंग्लंडमधील अनुकूल वातावरण

इंग्लंडमध्ये मे ते सप्टेंबरदरम्यान उन्हाळा असतो. अनेक पर्यटक यादरम्याने येथे फिरायला येत असतात. हेच कारण आहे की टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळवला जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी मागील दोन वर्षात उत्कृष्ट प्रदर्शन करुन अंतिम सामना गाठला आहे. (IND vs AUS WTC Final)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghatkopar Hording Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर; ४३ जणांवर उपचार सुरू, रात्रभर बचावकार्य

Rashi Bhavishya: 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराचे प्रेम मिळणार, तुमच्या राशीत काय?

Today Horoscope: कटकटी वाढतील, सावधगिरीने काम करा; 'या' चार राशीच्या लोकांचा आज धनयोग फळफळणार

Yamaha च्या या स्कूटरमध्ये मिळेल 21 लीटर अंडरसीट स्टोरेज, 49 Kmpl मायलेज; जाणून घ्या किंमत

Upcoming Bikes: मार्केट होणार जाम! जूनमध्ये लॉन्च होणार Royal Enfield Guerrilla 450; किती असेल किंमत?

SCROLL FOR NEXT