David Warner arrest saam tv
Sports

David Warner: डेव्हिड वॉर्नरला अटक; क्रिकेट विश्वात खळबळ, नेमकं कारण काय?

David Warner arrest: ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला पाकिस्तानमध्ये अटक झाल्याची घटना समोर आली आहे. दारू पिऊन गाडी चालवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी कारवाई केली.

Surabhi Jayashree Jagdish

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर एका कायदेशीर वादात अडकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वॉर्नरवर दारू पिऊन गाडी चालवल्याचा आरोप आहे आणि पोलिसांनी त्याला अटक केली होती. दरम्यान यानंतर त्याची सुटका करण्यात आली. ऑस्ट्रेलियाचा हा माजी ओपनर सध्या पाकिस्तान सुपर लीग २०२६ मध्ये कराची किंग्सचा कर्णधार आहे.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज वॉर्नर या प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सिडनीमध्ये दारू पिऊन गाडी चालवल्याच्या आरोपावरून वॉर्नरवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सुपर लीग 2026 दरम्यान कराची किंग्जस टीमचा कर्णधार असलेला वॉर्नर काही दिवसांच्या सुट्टीसाठी ऑस्ट्रेलियात परतला होता. याच काळात ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

पोलिसांनी तपासणी करून केली अटक

रविवारी रात्री सिडनीमधील मारुब्रा परिसरात पोलिसांनी रस्त्यावर नियमित तपासणी सुरू केली होती. यावेळी वॉर्नरने तपासणीच्या आधीच आपली कार पार्क केली होती. तरीही पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधून त्याची breath test केली. या चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळला.

यानंतर वॉर्नरला मारुब्रा पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं जिथे त्याची पुढील तपासणी करण्यात आली. या तपासणीत त्याच्या रक्तातील अल्कोहोलचं प्रमाण 0.104 इतकं आढळलं, जे कायद्याच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे.

पोलिसांनी केला गुन्हा दाखल

यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. अटक केल्यानंतर सर्वा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याला सोडून देण्यात आलं. तसंच मे 2026 मध्ये न्यायालयात हजर राहण्यासाठी त्याला नोटीस देण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: भररस्त्यात भाजप कार्यकर्त्याची हत्या, ९ गोळ्या झाडत जागीच संपवलं; पुणे हादरले

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे ₹१५०० बंद होणार, ई-केवायसीबाबत सरकारने दिली महत्वाची अपडेट

राज्यातील ५९ RTOऑफिसची १ मेपासून विशेष तपासणी मोहीम; नियम मोडणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर होणार कडक कारवाई

आपच्या खासदारानंतर आता 'या' राज्यातील अख्खा पक्षच भाजपमध्ये विलीन होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Weight Loss Foods: डाएटमध्येही खाऊ शकता हे ७ स्ट्रीट फूड, वजनावर काहीच होणार नाही परिणाम

SCROLL FOR NEXT