Rishabh Pant Latest News/File SAAM TV
Sports

Rishabh Pant : रिषभ पंतबाबत महत्वाचा निर्णय; BCCIचा मोठा प्लान आला समोर

बीसीसीआयच्या मेडिकल टीमने पंतला स्ट्रेंथिंग आणि कंडिशनिंग सेशनची शिफारस केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Rishabh Pant: टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंतला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय संघात स्थान मिळालेले नाही. बीसीसीआयने मंगळवारी संघाची घोषणा केली. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला T20I मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. मात्र ऋषभ पंतला संघात स्थान का मिळालं नाही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. या प्रश्नांची उत्तरे समोर येत आहे.

पंतला का वगळण्यात आलं याबाबत कोणतीही अधिकृत माहिती BCCI कडून देण्यात आली नाही. पंतच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. मात्र आता ऋषभ पंतला संघात स्थान न मिळण्याबाबतचा बीसीसीआयचा मोठा प्लान समोर आला आहे. ( Indian Cricket Team)

पंतला दुखापत झाली असून त्याला सध्या गुडघ्याचा त्रास आहे. पंतला आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे (एनसीए) रिपोर्ट करण्यास सांगितले आहे. विकेटकीपर्सना खूप वाकावे लागत असल्याने, बीसीसीआयच्या मेडिकल टीमने पंतला स्ट्रेंथिंग आणि कंडिशनिंग सेशनची शिफारस केली आहे. कारण तो ऑस्ट्रेलियातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये मोठी भूमिका बजावू शकतो.

ऋषभ पंतने 2022 मध्ये भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटने यावर्षी 12 डावांमध्ये 61.81 च्या सरासरीने आणि 90.90 च्या स्ट्राईक रेटने 680 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 2 शतके आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत.

पंतचं एनसीएतील सेशन नवीन वर्षात 3 जानेवारी - 15 जानेवारी नियोजित करण्यात आले आहे. त्यामुळेच त्याची या मालिकेसाठी निवड झालेली नाही. मात्र, बीसीसीआयने आपल्या निवेदनात याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. पंतच्या अनुपस्थितीत, संजू सॅमसन आणि इशान किशन हे दोघेही संघाचा भाग असतील.

ऋषभ पंतची कामगिरी

2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पंतने आतापर्यंत भारतासाठी 33 कसोटी, 30 एकदिवसीय आणि 66 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 2271, 865 आणि 987 धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT