Vijay Diwas  Saam Tv
Sports

Vijay Diwas : विजयदिनी कोण जिंकणार... भारत की बांग्लादेश?

भारतात ही तिथी विजय दिन म्हणून अभिमानाने स्मरणात ठेवली जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Vijay Diwas : भारतात ही तिथी विजय दिन म्हणून अभिमानाने स्मरणात ठेवली जाते. ५१ वर्षांपूर्वी याच दिवशी भारताने आपला शत्रू पाकिस्तानची दोन भागांत विभागणी केली होती. आता भारतीय क्रिकेट संघ १६ डिसेंबरला बांगलादेश जिंकण्याच्या तयारीत आहे.

युद्धाबद्दल नाही तर क्रिकेट सामन्याबद्दल बोलत जाणून घेऊयात. बांगलादेशविरुद्ध चितगाव येथे खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय (Indian) संघाने २५४ धावांची मोठी आघाडी घेतली आहे. सामन्यामध्ये अजून निम्म्याहून अधिक खेळ बाकी आहे.(Cricket)

भारत आणि बांगलादेश यांच्यात १४ डिसेंबरपासून कसोटी सामना होत आहे. भारताने सामन्याच्या पहिल्या दिवशी ६ गडी बाद २७८ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने आपला डाव ४०४ धावांवर संपुष्टात आणला. भारतीय गोलंदाजांनी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच १६ डिसेंबरला बांगलादेशला अवघ्या १५० धावांत रोखले. अशाप्रकारे त्याला २५४ धावांची आघाडी मिळाली.

अशात भारताला बांगलादेशला फॉलोऑन देण्याची संधी आहे. भारताने बांगलादेशला फॉलोऑनसाठी आमंत्रित केलं, तर तिसऱ्या दिवशीच ते मॅच जिंकतील अशी पूर्ण शक्यता आहे. म्हणजेच १६ डिसेंबरला चितगाव कसोटी जिंकायला हवी. आता भारतीय संघ बांगलादेशला फॉलोऑन देतो की स्वत:हून फलंदाजीला प्राधान्य देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टीम इंडियाबद्दल बोलायचं झालं तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शेवटच्या २ सीरिजपैकी ही एक सीरिज आहे. बांगलादेशला एकूण २ कसोटी सामने खेळायचे आहेत. यानंतर भारताला ऑस्ट्रेलियाकडून मायदेशात ४ टेस्ट खेळाव्या लागणार आहेत. अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला ६ पैकी ५ कसोटी सामने जिंकावे लागतील. गेल्या मोसमातही भारतीय संघ उपविजेता ठरला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: शाळेतील बोर्ड मिटिंगमध्ये अचानक कपडे काढू लागली महिला, अधिकारी पाहतच राहिले; VIDEO व्हायरल

Mira-Road : धक्कादायक! मिरा रोडमध्ये गरब्यात फेकली अंडी, तणाव वाढला | VIDEO

Idli Chutney Recipe: इडलीची चटणी खूप पातळं होतेय? मग ही खास स्टेप एकदा नक्की फॉलो करा

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Shirur News : फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट न केल्याने भयानक कृत्य; टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT