team-india  saam tv news
Sports

Team India T20 Captain: रोहित,हार्दिक की सूर्या? आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत कोण होणार टीम इंडियाचा कर्णधार?

Team India Captain In T20 World Cup 2024: मात्र टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व कोण करणार, जाणून घ्या.

Ankush Dhavre

ICC T20 World Cup 2024:

वनडे वर्ल्डकप समाप्त झाला असून सर्व संघाचं लक्ष आता आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेवर असणार आहे. येत्या जून २०२३ मध्ये वेस्टइंडिज आणि अमेरिकेत टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा होता. मात्र टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व कोण करणार, याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत कोण करणार भारतीय संघाचं नेतृत्व?

गेल्या काही टी-२० मालिकांमध्ये भारतीय टी-२० संघाची जबाबदारी हार्दिक पंड्याच्या हाती सोपवण्यात आली होती. यादरम्यान रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. मात्र वर्ल्डकप २०२३ स्पर्धा सुरु असताना हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला संघाबाहेर करण्यात आलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी सूर्यकुमारला भारतीय संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका झाल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या मालिकेतही हार्दिक पंड्या खेळाताना दिसून येणार नाही. तर माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. (Latest sports updates)

कोण होणार कर्णधार?

हार्दिक पंड्याला टी-२० संघांच नेतृत्व करण्यासाठी तयार केलं जात होतं. मात्र तो आता दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत रोहित शर्माने खेळण्यास नकार दिला आहे,असं म्हटलं जात आहे. मात्र बीसीसीआय त्याला खेळण्यासाठी तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. जर रोहितला टी-२० फॉरमॅटमध्ये नेतृत्व करायचं नसेल तर,हार्दिक पंड्या संघाचं नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो. मात्र हार्दिक पंड्याही दुखापतीमुळे खेळू शकला नाही तर केएल राहुल, सूर्यकुमार यादव किंवा जसप्रीत बुमराह हे संघाचं नेतृत्व करताना दिसून येऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT