rishabh pant girl friend yandex
क्रीडा

Rishabh Pant Girlfriend: रिषभ पंत आहे या तरुणीच्या प्रेमात! Photo पाहिलेत का?

Ankush Dhavre

Who Is Rishabh Pant Girlfriend: भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने बऱ्याच महिन्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक केलं आणि पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं आहे. डिसेंबर २०२२ मध्ये त्याच्या कारचा भीषण अपघात झाला होता.

या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. ज्यामुळे काही महिने तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. आता बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत त्याला खेळण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करत त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक झळकावले आहे.

ही आहे रिषभ पंतची गर्लफ्रेंड

माध्यमातील वृत्तानुसार, रिषभ पंत ईशा नेगीला डेट करतोय. यापूर्वी अनेकदा दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघेही एकत्र सेल्फी घेताना दिसून आले होते. २०१९ मध्ये ईशा नेगीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर रिषभ पंतसोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोला कॅप्शन देत तिने, 'मेरा आदमी, मेरा जीवनसाथी, मेरा सबसे अच्छा दोस्त, मेरी जिंदगी का प्यार...'असं लिहिलं होतं.'

रिषभ पंत हा भारतीय संघातील प्रमुख यष्टीरक्षक फलंदाज आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये तो भारतीय संघात यष्टीरक्षकाची भूमिका बजावतो. मात्र डिसेंबर २०२२ मध्ये त्याच्या कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता.

त्यामुळे त्याला काही महिने क्रिकेटपासून दूर राहावं लागलं होतं. त्याची प्रकृती इतकी नाजूक होती, की तो पून्हा कमबॅक करणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र पंतने हिम्मत केली आणि पुन्हा मैदानात उतरला. आयपीएल २०२४ स्पर्धेतून त्याने पुन्हा एकदा भारतीय संघासाठी कमबॅक केलं.

बांगलादेशविरुद्ध झळकावलं शतक

रिषभ पंतला बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याने शानदार शतकी खेळी केली. या सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने शतक झळकावलं. हा सामना भारतीय संघाने २८० धावांनी आपल्या नावावर केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: आनंद दिघेंना बाळासाहेबांपेक्षा वर नेण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप

Earbuds blast in woman ear : एअरबड्सचा झाला कानात स्फोट; महिला झाली कायमची बहिरी, नेमकं काय घडलं?VIDEO

Fact check : 2030 सालापर्यंत माणूस अमर होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Kriti Sanon: क्रिती सेनॉनचा स्वॅगच न्यारा, दिसते खूपच कमाल

Devendra Fadnavis Office : मंत्रालयाच्या सुरक्षेत मोठी चूक; गृहमंत्र्यांच्या ऑफिसबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीस म्हणाले... VIDEO

SCROLL FOR NEXT