Hayley Matthews Twitter
Sports

MI VS RCB: गोलंदाजीत हिट फलंदाजीत सुपरहिट! पोलार्ड - रसलचं मार्केट डाऊन करणारी हेली आहे तरी कोण?

WPL 2023: विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघातील फलंदाज हेली मॅथ्यूजचा स्फोटक अंदाज पाहायला मिळाला

Ankush Dhavre

Women’s Premier League: विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघातील फलंदाज हेली मॅथ्यूजचा (Hayley Matthews) स्फोटक अंदाज पाहायला मिळाला आहे. हेलीने ३८ चेंडूंचा सामना करत नाबाद ७७ धावांची तुफानी खेळी केली आहे.

या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने १५६ धावांचे आव्हान १५ व्या षटकात पूर्ण करत ९ गडी राखून विजय मिळवला आहे.(Latest sports updates)

हेलीने या खेळी दरम्यान २०२.६३ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. ज्यात १३ चौकार आणि १ गगनचुंबी षटकाराचा समावेश होता. तर गोलंदाजी करताना तिने ४ षटकात २८ धावा खर्च करत ३ गडी बाद केले आहेत.

हेली मॅथ्यूज (Hayley Matthews) ही वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे तिच्या खेळात आक्रमकता दिसून येत असते. हेली मॅथ्यूज मैदानावर येताच चेंडू मैदानाच्या बाहेर जायला सुरुवात होते.

यापूर्वी देखील आपण टी -२० लीग स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचा आक्रमक अंदाज पहिला आहे. ख्रिस गेल, आंद्रे रसल आणि कायरन पोलार्ड सारखे फलंदाज आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात. आता यात हेली मॅथ्यूजची भर पडली आहे.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून एकाही फलंदाजाला हवी तशी कामगिरी करता आली नाही.

प्रथम फलंदाजी करताना रिचा घोषने सर्वाधिक २८ धावांची खेळी केली. तर श्रेयंका पाटीलने २३ आणि कर्णधार स्म्रीती मंधानाने २३ धावांचे योगदान दिले. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा डाव १८.४ षटकात १५५ धावांवर संपुष्टात आला.

या धावांचा पाठलाग करताना यस्तिका भाटिया २३ धावा करत माघारी परतली. मात्र त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या हेली मॅथ्यूजने नाबाद ७७ आणि सिवर ब्रंटने नाबाद ५५ धावांची खेळी करत मुंबईला जोरदार विजय मिळवून दिला. हा मुंबईचा सलग दुसरा विजय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Corporation School : महापालिकेच्या ६५ पैकी तब्बल ४५ मराठी शाळा बंद; धुळे शहरातील धक्कादायक वास्तव

Fashion Inspired By GenZ Actress: नव्या ट्रेंडसाठी या जेन झी अभिनेत्रींची फॅशन टिप्स करा फॉलो

Kapil Sharma Cafe: कपिल शर्माच्या ज्या कॅफेवर गोळीबार झाला तो 'कॅप्स कॅफे' कुठे आहे?

अजित पवारांवर बोलताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, म्हणाले- ते महाजातीयवादी...VIDEO

Bike Ride: ९० ते १२२ बीएचपी पॉवर असलेल्या बजेट परफॉर्मन्स बाईक्स, रायडिंगसाठी सर्वोत्तम पर्याय

SCROLL FOR NEXT