Hardik Pandya Life Update SaamTV
Sports

Hardik Pandya: नताशासोबतच्या घटस्फोटानंतर कोणासोबत फिरतोय हार्दिक पंड्या? Photos झाले व्हायरल

Hardik Pandya Life Update: काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्याने नताशा स्टॅनकोव्हिकसोबत घटस्फोट घेतला असल्याचं जाहीर केलं. आता हार्दिक पंड्याचा एक फोटो व्हायरल होतोय. यामध्ये तो परदेशात फिरताना दिसतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hardik Pandya Viral Photos: गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा स्टार प्लेअर हार्दिक पंड्या आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याची मोठ्या प्रमणात चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्याने नताशा स्टॅनकोव्हिकसोबत घटस्फोट घेतला असल्याचं जाहीर केलं. या प्रकरणानंतर सोशल मीडियावर नताशाला ट्रोल देखील करण्यात आलं. अशातच आता हार्दिक पंड्याचा एक फोटो व्हायरल होतोय. यामध्ये तो परदेशात फिरताना दिसतोय. आता पंड्या कोणासोबत फिरायला गेला आहे हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.

सोशल मीडियावर शेअर केले फोटो

हार्दिकने पंड्याने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केलेत. यामध्ये तो ट्रेनमध्ये बसलेला दिसतोय. यावरून अंदाज लावण्यात येतोय की, पंड्या बाहेर फिरायला गेला आहे. मात्र तो कोणासोबत फिरत होता, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

हार्दिक पंड्याचे फोटो कोणा दुसऱ्या व्यक्तीने क्लिक केले आहेत. काही काळापूर्वी पांड्याचं नाव ब्रिटीश गायिका जास्मिन वालियासोबत जोडलं जात होतं. हे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याची कथित चर्चा होती. मात्र यासंदर्भात अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

नताशा-हार्दिकच्या घटस्फोटामागील कारण काय?

हार्दिक आणि नताशा का वेगळे झालं कारण समोर आल्याचं समजतंय. टाईम्स नाऊमधील एका बातमीनुसार, हार्दिकला खूप ग्लॅमरस लाइफ आवडत असल्याचं समोर आलं आहे. मात्र नताशाला या गोष्टींची फारशी आवड नव्हती. याबाबती ती हार्दिकला सांभाळू शकली नाही आणि त्यांच्यातील दुरावा वाढत गेला. यानंतर प्रकरण इतके वाढलं की, दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

या रिपोर्टमध्ये असंही नमूद करण्यात आलं आहे की, नताशानेही हार्दिकच्या म्हणण्यानुसार तिच्यामध्ये बदल आणण्याचा प्रयत्न केला. पण तिला ही गोष्ट शक्य झाली नाही. तर दुसरीकडे हार्दिकने स्वतःमध्ये बदल केलेला नाही. परिणामी दुरावा इतका वाढला की प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghee With Warm Water: सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा तूप घ्या; शरीराला मिळतील हे 6 मोठे फायदे

Maharashtra News Live Update: कोकणात देखील दुष्काळाची परिस्थिती

Political News: मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, राजकीय समिकरणं बदलणार

Bribe Case : मुंबईत २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, २ लाखांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडलं

RBI Repo Rate Hike: होम लोन घेणाऱ्यांचे टेन्शन वाढलं, EMI वाढण्याची शक्यता; RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT