team india Saam tv news
Sports

IND vs NZ: हार्दिक पंड्या आऊट! न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यासाठी या खेळाडूला मिळणार संधी

Hardik Pandya Replacement: या सामन्यासाठी हार्दिक पंड्याच्या जागी कोणाला संधी मिळणार?

Ankush Dhavre

Hardik Pandya Replacement:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत रविवारी (२२ ऑक्टोबर)हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. धर्मशाळेच्या मैदानावर यजमान भारतीय संघ आणि उपविजेता न्यूझीलंडचा संघ आमने सामने येणार आहे.

या सामन्यात भारतीय फलंदाजांची खरी कसोटी असणार आहे. कारण या खेळपट्टीवर गोलंदाजांना चांगला स्विंग मिळतो. न्यूझीलंडचे गोलंदाज भारतीय फलंदाजांनी प्रश्न विचारताना दिसून येऊ शकतो.

दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडला आहे. हार्दिक पंड्याच्या जागी कोणाला खेळवायचं हा मोठा सवाल रोहित शर्मा आणि भारतीय टीम मॅनेजमेंटसमोर असणार आहे.

या खेळाडूंना मिळू शकते संधी..

मोहम्मद शमी

हा सामना धर्मशाळेच्या मैदानावर रंगणार आहे. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे मोहम्मद शमीचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो. मोहम्मद शमी हा संघातील अनुभवी गोलंदाज आहे. शमीच्या येण्याने गोलंदाजीत खोली वाढेल. कारण तो नव्या चेंडूने आणि शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करून विकेट्स काढून देऊ शकतो.

सूर्यकुमार यादव..

सूर्यकुमार यादव हा आपल्या चौफेर फटकेबाजी ओळखला जातो. तो मध्यक्रमात संघासाठी मोलाचं योगदान देऊ शकतो. तसेच शेवटच्या षकांमध्ये संघाला गरज असताना मोठे फटके देखील खेळू शकतो. भारतीय संघाला फलंदाजीत खोली वाढवायची असेल तर सूर्यकुमार यादव हा उत्तम पर्याय आहे. (Latest sports updates)

ईशान किशन..

ईशान किशन फलंदाजीला येऊन काय करू शकतो हे त्याने अनेकदा सिद्ध देखील केलं आहे. या सामन्यासाठी जर भारतीय संघाला अतिरिक्त फलंदाजाची गरज असेल तर ईशान किशन हा योग्य पर्याय ठरू शकतो.

आर अश्विन

आर अश्विन फिरकी गोलंदाजीसह फलंदाजीतही मोलाचं योगदान देऊ शकतो. संघाला गरज असताना त्याने अनेकदा त्याने महत्वाच्या धावा करून विजय मिळवून दिला आहे. आता धर्मशाळेच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यासाठी कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT