ind vs eng saam tv news
Sports

Ind vs Eng 4th Test: भारत - इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा सामना केव्हा अन् कुठे रंगणार? जाणून घ्या A to Z माहिती

India vs England 4th Test: राजकोट कसोटीतही भारतीय खेळाडूंनी इंग्लंडला सळो की पळो करून सोडत ४३४ धावांनी विजय मिळवला. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे.

Ankush Dhavre

India vs England 4th Test, Match Details:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर विशाखापट्टनमच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने शानदार विजय मिळवला. आता राजकोट कसोटीतही भारतीय खेळाडूंनी इंग्लंडला सळो की पळो करून सोडत ४३४ धावांनी विजय मिळवला. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे.

मालिकेतील ३ कसोटी सामने झाल्यानंतर चौथा कसोटी सामना रांचीमध्ये रंगणार आहे. या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड पाहिला तर, भारतीय संघाने २ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान एका कसोटीत भारतीय संघाने बाजी मारली आहे. तर दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला आहे.

केव्हा आणि कुठे रंगणार सामना?

मालिकेतील चौथा कसोटी सामना येत्या २३ फेब्रुवारीपासून रांचीतील जे एससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळ ९:३० वाजता या सामन्याला प्रारंभ होईल. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही जियो सिनेमा ॲपवर फ्रीमध्ये पाहू शकता. जर तुम्ही हा सामना टीव्हीवर पाहत असाल तर तुम्ही स्पोर्ट्स १८ नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता. (Cricket news marathi)

भारतीय संघ आघाडीवर..

या मालिकेतील पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये पार पडला होता. या सामन्यात ओली पोपच्या शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने भारतीय संघावर २८ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर विशाखापट्टनमच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला १०६ धावांनी धूळ चारत मालिकेत १-१ ने दमदार कमबॅक केलं. आता राजकोट कसोटीत ४३४ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने इंग्लंडवर २-१ ने आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबई महानगरपालिकेचे ठेकेदारांनी अर्धवट काम करून बिल काढली

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT