World Cup Points Table And Semi Final Scenario: saam tv news
Sports

NZ vs SL: न्यूझीलंड -श्रीलंका सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास कसा लावला जाईल निकाल? कोण खेळणार सेमीफायनल?

World Cup Semi Final: या सामन्यात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Ankush Dhavre

World Cup Points Table And Semi Final Scenario:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ४१ वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये हा सामना बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना न्यूझीलंडसह पाकिस्तानसाठीही तितकाच महत्वाचा असणार आहे.

हा सामना जिंकून न्यूझीलंडला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे. दरम्यान या सामन्यात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जर या सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तर कसं असेल समीकरण? समजून घ्या.

भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या ३ संघांनी वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर चौथ्या स्थानी पोहचण्यासाठी न्यूझीलंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे.

आज होणाऱ्या सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचं भवितव्य ठरणार आहे. जर आज होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ जिंकला तर क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध न्यूझीलंड सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल.

मात्र जर असं झालं नाही तर पाकिस्तानचा संघ इंग्लंडला पराभूत करून सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो. असे झाल्यास भारत - पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल. (Latest sports updates)

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामना रद्द झाल्यास काय?

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका या सामन्यात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर याचा फायदा पाकिस्तानला होणार आहे. कारण न्यूझीलंड आणि श्रीलंकेला प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. ९ सामन्यानंतर न्यूझीलंडचा संघ ९ गुणांपर्यंत पोहचेल. असे झाल्यास पाकिस्तानला केवळ इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवायचा आहे.

सध्या भारतीय संघ ८ पैकी ८ सामने जिंकून १६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेने ६ सामने जिंकले आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा संघ या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ १० गुणांसह तिसऱ्या स्थानी, न्यूझीलंडचा संघ ८ गुणांसह चौथ्या आणि पाकिस्तानचा संघ ८ गुणांसह पाचव्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT