virat kohli yandex
Sports

Virat Kohli Record: नॉकआऊटमध्ये कसा राहिलाय विराट कोहलीचा रेकॉर्ड? पाहा आकडेवारी

Virat Kohli Records In Knock Out Matches: विराट कोहली हा भारतीय संघातील अनुभवी फलंदाज आहे. दरम्यान कसा राहिलाय विराटचा रेकॉर्ड? जाणून घ्या.

Ankush Dhavre
virat kohli

भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीत ३ सामने जिंकून सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. मात्र या तिन्ही सामन्यांमध्ये विराटला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. विराटने ३ सामन्यांमध्ये अवघ्या ५ धावा केल्या आहेत.

virat kohli

विराट कोहलीचा नॉक आऊटमधील रेकॉर्ड पाहिला, तर त्याने ४ सामन्यांमध्ये १४४ च्या शानदार सरासरीने २८८ धावा केल्या आहेत.

virat kohli

विराट हा नॉकआऊटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहे. आतापर्यंत केवळ दोन फलंदाज आहेत. ज्यांनी टी-२० वर्ल्डकपच्या नॉकआऊट्समध्ये २०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

virat kohli

विराट कोहलीने नॉकआऊटमध्ये ४ अर्धशतकी खेळ्या केल्या आहेत. यादरम्यान नाबाद ८९ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्याने वेस्टइंडिजविरुद्ध खेळताना ही खेळी केली होती.

virat kohli

विराटनंतर वेस्टइंडिजचा माजी फलंदाज मार्लोन सॅम्युयल्स या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने २०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

marlon samuels

मार्लोन सॅम्युयल्सने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील नॉकआऊट सामन्यांमध्ये २१५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ अर्धशतकं झळकावली आहेत.

jos buttler

इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जोस बटलर या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने देखील टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील नॉकआऊटमध्ये २०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

jos buttler

जोस बटलरबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ५ सामन्यांमध्ये २०३ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळ याला परदेशातून आणण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

Painkiller Side Effects: तुम्हाला कल्पनाही नसेल इतकी पेनकिलर आरोग्यावर करते परिणाम

Pune Terror Attack : पुण्यात खळबळ! 'I Love Mohammad' नंतर आता 'इस्लाममध्ये संगीत हराम आहे' आशयाचे पोस्टर्स झळकले

Myanmar: म्यानमारमध्ये बौद्ध उत्सवाला लक्ष्य, पॅराग्लायडरद्वारे बॉम्ब टाकले; २४ जणांचा मृत्यू

Kantara Chapter 1: 'हा चित्रपट आणि पात्र...'; ऋषभ शेट्टीने सांगितलं 'या' कारणामुळे 'कांतारा' ब्लॉकबस्टर होऊ शकला

SCROLL FOR NEXT