virat kohli
virat kohli saam tv
क्रीडा | IPL

Virat Kohli vs Gautam Gambhir : मैदानातच जोरदार राडा, विराट कोहली-नवीन भिडले; नतंर गंभीर सोबत झाला राडा - VIDEO

Ankush Dhavre

Virat Kohli And Naveen Ul Haq Fight: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ४३ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्याने २०१३ मध्ये झालेल्या घटनेच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या सामन्यात विजय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा झाला. मात्र गौतम गंभीर आणि विराट कोहली आणि नवीन उल हक हे तिघे या सामन्यात प्रचंड चर्चेत राहिले. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १२६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना लखनऊचा संघ अवघ्या १०८ धावांवर ऑल आउट झाला.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १८ धावांनी विजय मिळवला. दरम्यान हा सामना सुरु असताना विराट कोहली आणि नवीन उल हकी आणि विजयानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

हाय प्रेशर सामना काय असतो ते लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना पाहिला तर कळून येईल. सामना सुरु असताना नवीन उल हक आणि विराट कोहली यांच्यात बाचाबाची सुरु असल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान सामना झाल्यानंतरही जेव्हा खेळाडू एकमेकांसोबत हात मिळवणी करत होते त्यावेळी विराट कोहली नवीन उल हकला काहीतरी बोलताना दिसून आला. (Virat Kohli Naveen Ul Haq Fight)

ज्यावर नवीन उल हकने ही विराटचा हात झटकत प्रत्युत्तर दिले. हा वाद इथेच थांबला नाही. तर जेव्हा विराट कोहलीसोबत चर्चा करत होता. त्यावेळी लखनऊचा कोच गौतम गंभीर मध्यस्थी करायला आला. मात्र दोघांमध्येही जोरदार बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (Latest sports updates)

यापूर्वी देखील २०१३ मध्ये गौतम गंभीर आणि विराट कोहली आमने सामने आले होते. त्यावेळी विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. तर गौतम गंभीर हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करत होता. त्यावेळी रजत भाटियाने मध्यस्थी केली होती.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा जोरदार विजय..

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून कर्णधार फाफ डू प्लेसीसने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ३१ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटक अखेर १२६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना लखनऊ संघाला केवळ १०८ धावा करता आल्या . रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने या सामन्यात १८ धावांनी विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Mega block : मध्य रेल्वेवर आजपासून पंधरा दिवस ब्लॉक; कोणत्या मार्गांवर होणार परिणाम? जाणून घ्या

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

Shirur Lok Sabha Election 2024: हडपसर ठरवणार शिरूरचा खासदार?, संसदेत कोण जाणार कोल्हे की आढळराव?

Maharashtra Politics 2024 : मोदींच्या सभेत कांद्यावरून गोंधळ; नाशिकच्या भाषणात तरुणाची घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT