virat kohli saam tv news
Sports

Virat Kohli Comeback: विराट तिसऱ्या कसोटीतूनही बाहेर? कमबॅकबाबत समोर आली मोठी अपडेट

India vs England 2nd Test: विराटने मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमधून माघार घेतली होती. तो तिसऱ्या सामन्यात कमबॅक करणार का?

Ankush Dhavre

India vs England 3rd Test, Virat Kohli Latest Update:

इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर मालिकेतील दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने शानदार विजय मिळवत मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या १५ फेब्रुवारीपासून राजकोटच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. आता उर्वरीत ३ सामन्यांसाठी अजूनही भारतीय संघाची घोषणा केली गेलेली नाही. संघाची घोषणा करण्यासाठी उशीर होण्याला विराट कोहली कारणीभूत आहे, असा दावा माध्यमातील वृत्तांमध्ये केला जात आहे.

विराट पुढील सामन्यांमध्ये खेळणार की नाही हे स्पष्ट होऊ शकल्याने बीसीसीआय संघाची घोषणा करण्यास उशीर करत आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. ही मालिका सुरु होण्यापूर्वीच विराटने या सामन्यांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्याची रिप्लेसमेंट म्हणून रजत पाटीदारला संघात स्थान दिलं गेलं होतं. (Cricket news in marathi)

दरम्यान विशाखापट्टनम कसोटी झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित पवार चर्चा करताना दिसून येत आहे. या दोघांमध्ये विराट कोहली, केएल राहुल आणि रविंद्र जडेजाच्या कमबॅकबाबत चर्चा सुरु असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे .

विराट कोहली उर्वरीत सामने खेळणार का?

मालिकेतील पुढील सामने भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत .त्यामुळे विराट कोहलीसारखा अनुभवी फलंदाज संघात असणं गरजेचं असणार आहे. विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचा मध्यक्रम पूर्णपणे फ्लॉप ठरल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान विराट कोहली केव्हा कमबॅक करणार याबाबत कुठलीही अपडेट समोर आलेली नाही. पत्रकार परिषदेत राहुल द्रविडला त्याच्या कमबॅकबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.या प्रश्नाचं उत्तर देत तो म्हणाला की, याचं उत्तर निवडकर्तेच देऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pooja Sawant: पूजा सावंतचा गुलाबी साडीत खुलला मराठमोळा अंदाज; चाहत्यांच्या खिळल्या नजरा

Stylish Blouse Designs For Woman: साध्या साडीलाही मिळेल रिच लूक! ट्राय करा 5 हटके आणि ट्रेंडी ब्लाऊज पॅटर्न्स

UPI पेमेंट शुल्कावरून सर्वोच्च न्यायालय ॲक्शन मोडमध्ये; केंद्र सरकारसह RBI आणि NPCI ला नोटीस

Kidney Stones : तुम्हाला किडनी स्टोन झालाय? रोज खा 'ही' ४ हिरवी पाने

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले; सोयाबीन जाळून निषेध

SCROLL FOR NEXT