viral kohli twitter
Sports

Viral Kohli Viral Video: रागात पाहणाऱ्या हार्दिकला विराटने डिवचलं; चौकार मारताच केला भन्नाट डान्स; पाहा VIDEO

Viral Kohli - Hardik Pandya Viral Video: विराट कोहली आणि हार्दिक पंड्या नेट्समध्ये मस्ती करताना दिसून आले आहेत

Ankush Dhavre

Cricket Funny Dance: भारतीय संघ वेस्टइंडीज विरुद्धची वनडे मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना बार्बाडोसच्या मैदानावर रंगणार आहे.

या सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू नेट्समध्ये जोरदार सराव करताना दिसून येणार आहेत. दरम्यान नेट्समध्ये सराव करत असताना विराट कोहली आणि हार्दिक पंड्या नेट्समध्ये मस्ती करताना दिसून आले आहेत. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हार्दिक पंड्या विराट कोहलीसमोर गोलंदाजी करताना दिसून येत आहे. त्यावेळी हार्दिक पंड्याच्या चेंडूवर विराट कोहली चाबूक शॉट मारतो. हे पाहून हार्दिक पंड्या निराश होऊन मागे फिरतो आणि पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी जात असतो.

त्यावेळी हार्दिक पंड्याला डिवचण्यासाठी विराट कोहली डान्स करताना दिसून येतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

विराट कोहलीचा हार्दिक पंड्यासोबतचा सराव करतानाचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे हार्दिक पंड्या वनडे मालिकेत अष्टपैलु खेळाडूची भूमिका पार पाडताना दिसून येणार आहे. (Latest sports updates)

कसोटी मालिकेत भारतीय संघाची १-० ने मारली बाजी..

भारत आणि वेस्टइंडीज या संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगली होती. या मालिकेत भारतीय संघाने १-० ने बाजी मारली होती. आता भारतीय संघ ३ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्र शूट करत राहिले अन् रीलस्टारचा बुडून मृत्यू, तो रील अखेरचा ठरला, भंडाऱ्यात खळबळ

Horoscope Monday Update : अचानक हाती येईल पैसा, वाचा आजचे खास राशीभविष्य

Shoe Bite Remedy: नवीन बूट घातल्यानंतर पायाला चावतात का? 'या' नैसर्गिक उपायांनी मिळवा झपाट्याने आराम

Maharashtra Politics: मराठी एकजुटीच्या द्वेषाची फडणवीसांना कावीळ झाली, सामानाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

SCROLL FOR NEXT